Share

‘दिवाळीनंतर बॉम्ब फोडताना दारू शिल्लक आहे का पाहा, अन्यथा..’

Published On: 

मुंबई: देशभरात पार पडलेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निकालांवरुन शिवसेनेने भाजपाला चांगलाच टोला लगावला आहे. मोदींच्या जीवावर शिवसेनेचे १८ खासदार निवडणून आल्याचा दावा करणाऱ्या महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना या निवडणुकीमधून उत्तर मिळाल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे. दादरा-नगर हवेलीमधील डेलकर यांचा विजय बरंच काही सुचित करणारा असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. दरम्यान यावरच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजपवर निशाना साधला आहे.

ऐन दिवाळीत भारतीय जनता पक्षाचे कंदील विझले आहेत. हा शुभशकुन नाही. आपणच अजिंक्य आणि अजेय आहोत या त्यांच्या अहंकारासही पोटनिवडणुकांच्या निकालांनी तडा गेला आहे. तेरा राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकाल तेच सांगतात. लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या २९ जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. त्यात काँग्रेसने मुसंडी मारलीच, पण दादरा-नगर हवेली या लोकसभा मतदारसंघात शिवसेना जोरदार विजयी झाली आहे. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला खासदार निवडून येण्याचा मान दादरा-नगर हवेलीच्या कलाबेन डेलकर यांना मिळाला आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच यावरून हिंदी पट्टय़ात भाजपाविरोधी वातावरण आहे हेसुद्धा दिसते. महाराष्ट्रातील भाजपावाले एक तुणतुणे कायम वाजवत असतात, मोदींमुळे शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. त्यांच्यासाठी दादरा-नगर हवेलीचा शिवसेना विजय सत्यकथन करतोय. गुजरातच्या सीमेवरील प्रदेशात मोदींचे नाव न घेता, पोस्टरवर त्यांचे चित्र न लावता शिवसेना जिंकली व देगलुरला ‘मोदी मोदी’ करूनही भाजपाला माती खावी लागली. दिवाळीचे फटाके फुटू लागले आहेत. कुणाला दिवाळीनंतर बॉम्ब फोडायचे असतील तर ते फोडावेत. त्या बॉम्बमध्ये दारू शिल्लक आहे काय तेवढेच एकदा बघा. नाही तर हसे व्हायचे. असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!