Share

पवार साहेबांना सोडून गेले त्यांची अकोल्यात काय गत झाली बघा; अजित पवारांच्या पिचडांना कानपिचक्या

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर:- राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या मधुकर पिचड व त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. वैभव पिचड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण लहामटे यांनी विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव केला होता.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज पहिल्यांदा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात आले होते. त्यावेळी त्यांनी जुने सहकारी मधुकर पिचड यांना आपल्या खास शैलीत चिमटे काढले. काही लोक शरद पवार साहेबांना सोडून गेले, अकोल्यात त्यांची काय गत झाली बघा, सोडून गेलेले पडले असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार वैभव पिचड आणि मधुकर पिचड या पितापुत्रांना टोला लगावला आहे.

अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी ‌येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे प्राजक्त तनपुरे यांचे नात्याने मामा आहेत, त्यावरही अजित पवारांनी मिश्किल भाष्य केले. मामाची विकास निधीसाठी मदत घ्या, नाही तर माझाच मामा व्हायचा, असं म्हणत अजित पवार हसले. महाविकास आघाडीत जे जे नेते येतील त्यांना प्राधान्य दिले जाईल, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!