मुंबई : सोज्वळ स्वभाव अन् सौंदर्याने घायाळ करणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फाेटोत एकदम छान दिसत आहे.
या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाची खण पैठणी नेसली असून, त्यावर तिने पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज घातलेला आहे. हातात हिरव्या रंगाचा चुडा, कानात मोठे झुमके, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, केसात गजरा असा अगदी मराठमोळा साजश्रृंगार केला आहे. तिच्या साडीच्या पदरावर ‘ यदा यदा ही धर्मस्थ ग्लानिर्भवती भारत..’ हा महाभारता तील श्लोक लिहिला आहे. तेजस्विनीच्या या लुकसोबतच तिच्या पदरावरील श्लोकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
तेजस्विनीचा हा लूक तिच्या चाहत्यांना नेहमीप्रमाणेच खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करूल तिचे कौतुक करत आहेत. अशातच तेजस्विनीचा खास मित्र आणि अभिनेता सिध्दार्थ जाधव याने या फोटोवर ईमोजी पोस्ट केले आहे. तिच्या चाहत्यांनी लयभारी अशी कमेंट केली आहे, तर काहींना तिची साडी खूपच आवडली आहे. तेजस्विनीनं ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका केली होती. त्यानंतर ‘ तु ही रे’ या चित्रपटात काम केले.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेना-भाजप भविष्यात अनेक वर्षे ते एकत्र येण्याची शक्यता नाही – अमोल मिटकरी
- ‘पुढचे तीन वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहणार असतील तर भाजपसोबत जाण्यास तयार’
- पुन्हा बरसणार : राज्यात ‘या’ दिवसापासून गडगडाटासह जोरदार पाऊस; हवामान खात्याची माहिती
- राज्यपालांनी महिलेचा मास्क काढल्याने वाद; अजितदादा म्हणाले, ‘राज्यपाल महामहिम, त्यांच्याबाबत…’
- उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी वर्षा गायकवाड यांच्यावर काँग्रेसने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी


