Share

Raj Thackeray | अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून बघा- राज ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई  : शिंदे गट स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरणामध्ये चांगलाच बदल झालेला दिसून येतं आहे. परंतू या संधीचा फायदा मात्र इतर पक्षांना होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काही सूचना दिल्या आहे.

राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून पहा, असं राज ठाकरे यांनी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर राज ठाकरे यांनी पुन्हा जोमाने काम करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे मागिल दोन महिन्यांमधील काम-कागाजाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांसोबत बैठक बोलावली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी या सूचना दिल्या आहेत.

तसेच, लोक सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणाला वैतागले आहेत. त्यामुळे ही अस्थिरता एक संधी आहे, अशा अर्थाने त्याकडे पहा. त्याचप्रमाणे लोक आपला विचार करत आहेत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची येत्या 25 ऑगस्टपासून राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये नोंदणी सुरु केली जाणार असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!