Share

Devendra Fadnavis | विनायक मेटेंचा अपघात की घातपात? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : माजी आमदार विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार अपघातात मृत्यू झाला. यानंतर घातपात झाल्याची चर्चा होत झाली होती. आज देखील विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विनायक मेटे यांचा ड्रायव्हर सतत जबाब बदलत असल्याचे म्हटले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हा अपघात पूर्णपणे ड्रायव्हरच्या चुकीच्या निर्णयामुळे झाल्याचे फडणवीस म्हणाले.

52 वर्षीय शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांची कार 14 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील मंडप बोगद्याजवळ एक्स्प्रेस वेवर मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकला धडकली. यामध्ये मेटे यांचा मृत्यू झाला.

चालकाने लेन बदलून… –

माजी आमदार विनायक मेटे हे बीड येथून मुंबईत मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जात होते. मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी मांडलेल्या लक्षवेधी प्रस्तावाला फडणवीस यांनी सोमवारी प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले-

“चालकाने लेन बदलून डावीकडून लेनच्या मध्यभागी असलेल्या दुसऱ्या अवजड वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. अजून एक जड वाहन आधीच डाव्या लेनमध्ये जात होते आणि त्याला ओव्हरटेक करायला जागा नव्हती. ड्रायव्हरचा हा पूर्णपणे चुकीचा निर्णय होता,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ड्रायव्हरच्या बाजूवर परिणाम झाला नाही-

“मेटे कारच्या मागच्या सीटवर बसले होते आणि अपघाताचा फटका त्या बाजूलाच होता. त्याचा ड्रायव्हरच्या बाजूवर परिणाम झाला नाही किंवा त्या बाजूने वाहनाचे कोणतेही नुकसान झाले नाही,” असे फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!