🕒 1 min read
मुंबई : शिल्पा शेट्टी हिचा फिटनेस सर्वांनाच भुरळ पाडतो. अलीकडेच रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. सहसा लोक अशा स्थितीमध्ये बेड रेस्ट घेतात. मात्र शिल्पाने असं न करता स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती व्हील चेअरवर बसून योगा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण तिचं कौतुक करत आहे.
शिल्पा शेट्टी व्हील चेअरवर योगा करताना व्हिडीओः
शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती योगा सुरू करण्यापूर्वी ‘पाय तुटला आहे पण हिंमत नाही’ असं म्हणते. शिल्पाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘इंडियन पोलिस फोर्स’च्या सेटवर एका अॅक्शन सीनदरम्यान शिल्पाच्या पायाला लचक आली आणि त्यानंतर तिच्या पायाला प्लास्टर बांधण्यात आलं. डॉक्टरांनी शिल्पाला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
‘इंडियन पोलिस फोर्स’ वेब सीरिजमध्ये दिसणार आहेः
शिल्पा शेट्टी सध्या तिच्या घरी आराम करत असली तरी सोशल मीडियावर ती पूर्णपणे सक्रिय आहे. अलीकडेच तिने कृष्ण जन्माष्टमीचा व्हिडिओही शेअर केला होता आणि आता व्हील चेअरवर योगा करतानाही तिचा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. शिल्पा शेट्टी 47 वर्षांची झाली आहे. मात्र, फिटनेसच्या बाबतीत ती नव्या अभिनेत्रींनाही मागे टाकते.
दरम्यान, शिल्पा शेट्टी नुकतीच ‘निकम्मा’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही गाजला नाही. फिल्मी पडद्याव्यतिरिक्त शिल्पा टीव्हीवरील अनेक रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसली आहे. अभिनेत्रीची ‘इंडियन पोलिस फोर्स’ ही वेब सिरीज Amazon प्राईम वर स्ट्रीम केली जाणार आहे. या वेबसिरीजमध्ये शिल्पाशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय हे देखील दिसणार आहेत.
पाहा व्हिडीओः
https://www.instagram.com/reel/ChjRHLaFwkB/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्याः
- Devendra Fadnavis | विनायक मेटेंचा अपघात की घातपात? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं
- Sonam Kapoor | सोनम कपूर आई झाल्यानंतर असा फोटो केला शेअर, फॅन्सने केलं ट्रोल
- Ajit Pawar। नगराध्यक्ष पदाबाबतचा तुम्ही घेतलेलाच निर्णय तुम्ही बदलताय; अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं
- Mangal Prabhat Lodha | “जरा थांबा, दमाने घ्या…मी नवीन प्लेअर” ; मंगल प्रभात लोढा यांचे विरोधकांना उत्तर
- Deepali Sayed | “धनुष्यबाण हे शिवसेनेते मान्यताप्राप्त मतदान चिन्ह, त्याला वाचवा…” – दिपाली सय्यद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
