Share

राज्यात १ जून नंतरही लॉकडाऊन ? आदित्य ठाकरे म्हणाले…

Published On: 

मुंबई : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काहीसा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये घट होत असून कोरोना मुक्तांचा आकडा हा अधिक आहे. मात्र, अद्यापही राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या हि चार लाखांपार असून दररोज रुग्णांमध्ये होणारी वाढ ही देखील आटोक्याबाहेर आहे. अशातच, तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला असून लहान वयोगटातील मुला-मुलींना अधिक धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर आता राज्यातील निर्बंध पुन्हा १ जूननंतर वाढणार की काही दिलासा मिळणार याकडं राज्यातील जनतेचं लक्ष्य लागलं आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये लॉकडाऊनवर भाष्य केलं आहे. राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येवर हे सर्व अवलंबून असेल, असं ते म्हणाले आहेत.

‘राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येवर हे सर्व अवलंबून असेल. राज्यात चाचण्यांची संख्या वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत असून प्रत्येकाने चाचणी करावी यासाठीही पुढाकार घेत आहोत. करोना रुग्णसंख्या किती आहे यावरच लॉकडाउन उठवला जावा की वाढवला जावा हे अवलंबून असेल. आरोग्य आणि सुरक्षा आमची प्राथमिकता असणार आहे,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पुढे त्यांनी नागरिकांना टोला देखील लगावला. ‘लॉकडाऊन असला तरी राज्यात महत्वाची कार्यालयं, निर्मिती उद्योग, आयात आणि निर्यात सुरु आहे. पण तुम्ही अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर कधी पडायला मिळेल असं विचारत असाल तर ते पूर्णपणे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे,’ अशा कानपिचक्या आदित्य ठाकरे यांनी काढला आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!