Share

चक्रीवादळात नातवासाठी आजोबाच ठरले सुपरहिरो ;पाच वर्षाचा नातू बचावला

Published On: 

रत्नागिरी : भीषण तौक्ते चक्रीवादळ हे सोमवारी रात्री गुजरातच्या सौराष्ट्र किनाऱ्यावर धडकलं. यादरम्यान १८५ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वारे वाहत होते. तर महाराष्ट्रासह मुंबईतही या चक्रीवादळाने हाहाकार माजवला. तौत्के चक्रीवादळामुळे मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरु आहे.

गेल्या वर्षी निसर्ग आणि आता तौक्तेमुळे कोकणात कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. तोक्ते वादळानं काल कोकणाला झोडपून काढलं. हे वादळ रत्नागिरी तालुक्यातील कर्ले गावातील कलंबटे कुटुंबीयांसाठी जीवघेणं ठरणार होतं. मात्रतोक्ते चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संकटातून नातवाचे वाचलेले प्राण या संपूर्ण प्रसंग ७० वर्षीय आजोबा अशोक कलंबटे यांच्या डोळ्यासमोर आहे.

‘संध्याकाळी पाच वाजताची वेळ होती. वारा जोरात होता. आम्ही सर्व घरातच होतो. पावसामुळे बाहेर जाणं आम्ही टाळलं. माझा पाच वर्षाचा नातू वेदांत खेळत होता. काही वेळाने मी देवासमोर दिवा लावण्यासाठी देवघरात गेलो. तोच बाहेरुन धडाम असा आवाज आला. घरासमोरील मोठं झाड आमच्या घरावर पडलं होतं. घराचे पत्रे फुटत होते. माझे डोळे वेदांतला शोधत होते. तोच वेदांत मला दिसला. वरुन पत्रे कोसळत होते. वेदांत पत्रे कोसळत असलेल्या खोलीकडे जात होता. मी त्याला क्षणाचाही विलंब न लावता मागे खेचलं आणि त्याला पोटाखाली धरलं. माझ्या पाठीवर पत्रे पडले. मला मार लागला. पण माझा नातू सुखरुप असल्याचं समाधान होतं. जर मी माझ्या नातवाला खेचलं नसतं तर कोण जाणे काय झालं असतं. आम्हाला या प्रसंगाची कल्पना देखील करवत नाही’ असा हा सर्व भयानक थरार सांगताना आजोबा मात्र चांगलेच गहिवरले होते.

कुटुंबातील आजोबांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे नातवाचा जीव वाचला. नातवाला वाचवताना आजोबा अशोक कलंबटे यांच्या पाठीला दुखापत झाली. तर आजीच्या देखील डोक्याला टाके पडले आहेत. मात्र नातू वाचल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आहे.

त्यामुळे परिसरामध्ये सदर आजोबाच या नातवासाठी सुपरहिरो ठरले असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. परंतु यामुळे त्यांच्या घराचे मात्र भयंकर नुकसान झालेले आहे. या बद्दल बोलताना ते म्हणाले कि, ‘चक्रीवादळामुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सारा संसार वादळाने हिरावला. आता आम्ही शेजाऱ्यांकडे राहत आहोत. लाखोंचा खर्च आता आम्हाला करायला लागणार आहे. पण, समाधान एकच आमचा नातू सुखरुप आहे,’ असं कलंबटे यांनी सांगितलं.

कालचा दिवस हा कलंबटे कुटुंबीयांसाठी अतिशय भयानक होता. असा दिवस कोणाच्याच आयुष्यात येवून नये. त्यांनी काल ज्या परीस्थितीशी दोन हात केले तशी वेळ कोणावर देखील येवू नये असे देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!