Share

व्यवसाय बुडाले,नोकऱ्या गेल्या…आता काही बेजबाबदार लोकांमुळे राज्यावर पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लवकरच सरकारकडून लॉकडाऊन करावे कि नको यबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

राज्यात काल आठ हजार ३३३ कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. तर, परवा पेक्षा काल अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल ४९३६ कोरोना बाधित रुग्ण हे बरे झाले आहेत. दरम्यान, एकूण २० लाख १७ हजार ३०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या काही दिवसांमध्ये रोज आठ हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात येत आहे.

कोरोनाची महाराष्ट्रातील आकडेवारी काहीशी भीतीदायक आहे. कोरोनाचे आकडे पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात निर्बंध लादण्यात आले आहेत.काही ठिकाणी नागरिक नियमांचे पालन करत आहेत तर काही ठिकाणी नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. सरकार मागच्या वेळी आलेला अनुभव लक्षात घेवून सावध पालवे उचलत असले तरीही आगामी काळात नागरिक जबाबदारीने न वागल्यास लॉकडाऊन करावे लागल्यास तेच जबाबदार असतील अशी स्थिती आहे.

परिस्थिती आणखी बिघडली तर शाळा आणि महाविद्यालये महिनाभरासाठी बंद राहू शकतात, शिवाय लग्नसमारंभांवर देखील दोन महिन्यांसाठी कडक निर्बंध येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बार बंद ठेवणे, हॉटेल-रेस्टॉरंटमधून फक्त पार्सल सेवा सुरू ठेवणे इ. निर्बंध लादले जाऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बुडाले,नोकऱ्या गेल्या,अनेकांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. आता कुठे जनजीवन पूर्वपदावर येत असताना बेजबाबदार लोकांमुळे आता पुन्हा लॉकडाऊनची घोषणा होणे हे कुणालाच परवडणारे नाही. हे टाळायचे असल्यास सर्वानीच जबाबदारीने वागणे आवशयक आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!