Share

रायगड किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या पाचाड गावात टाळेबंदी जाहीर ; संभाजीराजेंच्या भूमिकेकडे लक्ष

Published On: 

🕒 1 min read

रायगड : ६ जून ही तारीख महाराष्ट्राच्या, संपूर्ण देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिली गेली आहे. याच दिवशी स्वराज्यनिमिर्तीची मशाल रयतेमध्ये पेटवणाऱ्या शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला अन् राजं छत्रपती झाले. आता याच दिवशी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी रायगडावरून आक्रमक आंदोलन केलं जाईल अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली असून मिळेल त्या वाहनाने रायगडावर दाखल व्हा, असा सांगावाचं त्यांनी दिला आहे.

परंतु आता वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात टाळेबंदी लावण्यात आली आहे. कोरोनाच्या गावातील परिस्थितीवरून ग्रामपंचायतीनं हा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता हॉटेल, लॉजिंग व्यवसाय पूर्णपणे बंद राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे 6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनी कोणी गावात येऊ नये, असे आवाहन ग्रामस्थांनी शिवभक्तांना केले आहे.

छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी 6 जूनला किल्ले रायगडावर येण्याचे शिवप्रेमींना केलेले आवाहन आणि आता पाचाड गावामध्ये केलेली टाळेबंदी हा आता वादाचा मुद्दा ठरणार की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी ग्रामस्थांनी टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. शिवप्रेमींनी सहकार्य करावं असं आवाहन पाचाड ग्रामस्थांनी केल्यानं आता शिवराज्याभिषेक दिनाचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता यावर संभाजीराजे काय भूमिका घेणार याकडं अनेकांचं लक्ष लागलं आहे.

किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावामध्ये ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीनं टाळेबंदी लावली आहे. गावात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यानं ग्रामस्थांनी हा निर्यय घेतला असून यामध्ये शासनाच्या नियमाच्या अधिन राहुन अत्यावश्यक सेवा वगळता सर्व हॉटेल, लॉजिंग व्यवसाय पूर्णपणे बंद केले आहेत. त्याला परिसरातील ग्रामस्थ आणि व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत व्यवसाय बंद केले आहेत.

दरम्यान, गेली कित्येक वर्षे रायगडावर शिवराज्याभिषेक दिन हा उत्साहात साजरा केला जातो. यावेळी हजारो शिवभक्त रायगडावर दाखल होत असतात. शिवराज्याभिषेक महोत्सव समिती ही सर्व आयोजन करत असते. आता या समितीच्या सदस्यत्वाची नोंदणी ऑनलाईन फॉर्मद्वारे सुरु केल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. याबाबत त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!