सोलापूर – महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. मागील दहा दिवसांमधली जर पॉझिटिव्ह कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेतली तर पॉझिटिव्ह होणाऱ्या रूग्णसंख्येचा आलेख हा चढताच आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या प्रमुख शहरांमध्ये पॉझिटिव्ह रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. ही बाब नक्कीच चिंता वाढवणारी आहे. गुरूवारी जी कोरोना रूग्णांची संख्या समोर आली त्यानुसार राज्यात ३५ हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रूग्ण दिवसभरात आढळले आहेत. मागील काही दिवसांपासून ही संख्या सातत्याने २५ हजारांपेक्षा जास्त नोंदवली जाते आहे.
दरम्यान,वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वांचीच चिंता वाढत असताना कर्नाटकला लागुनच असलेल्या सोलापुरात एकाच दिवसात पाचशेहून अधिक रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याचं दिसून आलंय. सोलापूर शहरात 217 तर ग्रामीण भागात 299 असे एकूण 516 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत तर शहरात दोन आणि ग्रामीण भागात दोन अशा चौघांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्ण संख्या वाढत आहे.यामुळे कर्नाटकातील एकसंबा आणि महाराष्ट्रातील दानवाड या गावांना जोडणाऱ्या पुलावर काटेरी झाडांच्या मोठ्या फांद्या टाकून रस्ता वाहतुकीसाठी स्थानिकांनी बंद केला आहे. रस्ता बंद करण्या संबंधी कोणताही आदेश नसताना रस्ता बंद करण्यात आला आहे.यामुळे कामानिमित्त आणि नोकरीसाठी ये जा करणाऱ्या जनतेची गैरसोय झाली आहे.एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचा शिवसैनिक उभा आहे, चौकशीची मागणी मीच करतोय- अरविंद सावंत
- सदाबहार, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर !
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट
- बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्येही होणार विद्यापीठाच्या परीक्षा
- शिमग्याला घरोघरी देवांची पालखी नेण्यास बंदी; होळीसाठी नियमावली जाहीर !


