Share

कोरोना लस मिळवण्यासाठी लॉबिंग? राजेश टोपेंनी केला महत्वाचा खुलासा

Published On: 

मुंबई : गेले आठ महिने देशासह जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या रोगावरील लस शोधण्याचं काम सद्या प्रगतीपथावर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटसह हैद्राबाद व अहमदाबाद येथीस लस संशोधन करण्याऱ्या कंपनीला देखील त्यांनी भेट दिली होती.

या तिन्ही लशींना चांगल्या प्रमाणात लस मिळत असून पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने मोठ्या प्रमाणात लस निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. यासह सुरुवातीला भारत, आशियाई देशांसह आफ्रिकेतील देशांना प्राधान्याने लस पुरवठा करणार असल्याचे सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासह ८ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी लस वाटपाबाबत आढावा बैठक घेऊन महत्वाच्या सूचना केल्या होत्या. आता, लस वाटपावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ‘कुणी कितीही मागणी केली तरी प्रथम श्रेणीत कोरोना सेवकांनाच लस देण्यात येणार’असल्याचं स्पष्टीकरण राजेश टोपेंनी एबीपी माझाशी बोलताना दिलं आहे.

हाराष्ट्रात प्रथम लस देण्यात येणाऱ्यांची यादी तयार करण्याचं काम सुरु आहे. या यादित नाव टाकण्यासाठी राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी फिल्डींग लावत असल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भात बोलताना टोपेंनी हे आरोप फेटाळून लावत कोरोना सेवकांनाच प्राधान्य दिलं जाईल असं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!