Share

‘युपी पोलिसांप्रमाणेच महाराष्ट्र सरकार देखील पीडित कुटुंबावर दडपशाही करत आहे’

Published On: 

बीड : राज्यात सद्या आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. मराठा समाज अधिक आक्रमक होत असून राज्यभरात आंदोलनाचा बडगा उगारला आहे. अनेक नेत्यांनी या आरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. अशातच बीडमधील विवेक रहाडे या युवकाने टोकाचा निर्णय घेऊन आपले जीवन संपवले.

‘विवेक रहाडे या तरुणाच्या आत्महत्येला सरकार वेगळं वळण देत आहे. उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार पीडित कुटुंबावर दडपशाही करत असेल तर कदापिही मराठा समाज सहन करणार नाही. राज्य सरकार विषयाला वेगळ्या दिशने नेण्याचा प्रयत्न करत असेल तर सरकारला मराठा समाजाच्या तीव्र रोषाला समोर जावं लागेल,’ असा आक्रमक इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक-महेश डोंगरे यांनी दिला आहे.

…अन्यथा मराठा समाज सरकारला जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही!

‘९ तारखेला तुळजापूरला जागर मोर्चा होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल. अजून तुम्हाला चार-पाच दिवस आहेत. तुम्ही तात्काळ पोलीस भरतीला स्थगिती द्या. सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करा, नाहीतर मराठा समाज तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही,’ असा घणाघात देखील त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

दरम्यान, विवेकने लिहिलेल्या चिठ्ठीतील अक्षर विवेकचे नसल्याचा अहवाल औरंगाबाद येथील हस्ताक्षर तज्ञांनी दिल्याने विवेकच्या घरच्यांवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत असले तरी कुटुंबीयांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. त्यामुळे विवेकच्या या टोकाच्या निर्णयाचे नेमकं कारण काय? हे तपासावरूनच निष्पन्न होईल.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!