🕒 1 min read
नवी दिल्ली- केंद्र सरकारने देशभरातून विरोध असताना कृषी कायदा आणला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस सत्तेत आल्यास तिन्ही काळे कायदे रद्द करुन कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ, असं आश्वासन पंजाबच्या जनतेला दिलं आहे.
राहुल गांधी यांनी कृषी विधेयकावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज पंजाबमधील मोगा येथे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टररॅली काढण्यात आली. त्यावेळी त्यांना शेतकऱ्यांना संबोधित केले. राहुल म्हणाले की, सरकारला हा बिल मंजूर करायचा होता तर, त्यांनी लोकसभेत आणि राज्यसभेत याविषयी चर्चा का केली नाही?. हे सरकार शेतकऱ्यांचे वाटोळे करणारे सरकार आहे असे राहुल यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, मी शेतकऱ्यांना हमी देऊ इच्छितो की, ज्या दिवशी काँग्रेस सत्तेवर येईल, त्या दिवशी या तिन्ही काळ्या कायद्यांना नष्ट करेल आणि या कायद्यांना कचऱ्यांच्या डब्यात फेकून देईल. मी पंजाबमधील शेतकऱ्यांना विश्वास देऊ इच्छितो की, काँग्रेस देशभरातील शेतकऱ्यांच्या सोबत उभी आहे. काँग्रेस आपल्या आश्वासनापासून एक इंचही मागे हटणार नाही.
दरम्यान, केंद्र सरकारने बळीराजाच्या हितार्थ कृषी कायद्यामध्ये बदल करून बळीराजाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणारा नवीन कृषी कायदा अंमलात आणला. शेतमालाला दुप्पट भाव मिळवून देण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्यामुळे हा नवीन कायदा शेतकºयांच्या हितासाठी ऐतिहासिक ठरणार आहे, असे मत केंद्रीय मानव संसाधन मंत्री संजय धोत्रे यांनी ४ आॅक्टोंबर रोजी स्थानिक विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या :-
- महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीसाठी पवार सरसावले; अनिवासीय मराठी भारतीयांसोबत साधला संवाद
- मुंबई पोलिसांवर आणि महाविकास आघाडी सरकारवर आरोप करणारे आता तोंडघशी पडले’
- अखेर चांदोली अभयारण्यग्रस्त प्रकल्पग्रस्तांना रखडलेला उदरनिर्वाह भत्ता मिळाला
- मिशन बिगिन अगेन : रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत कार्यप्रणाली जाहीर
- लोकजनशक्ती पार्टी संस्थापक रामविलास पासवान यांची प्रकृती आणखी खालावली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
