🕒 1 min read
दुबई : यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या टीमला संघर्ष करावा लागत होता . आतापर्यंत खेळलेल्या 3 मॅचपैकी 2 मॅचमध्ये चेन्नईचा पराभव झाला होता. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई शेवटच्या क्रमांकावर होता. सुरेश रैना (Suresh Raina) आणि हरभजन सिंग हे दोन दिग्गज खेळाडू नसल्यामुळे चेन्नईच्या टीममध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचं चित्र आहे.
मागील झालेल्या सामन्यांमध्ये चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सन राईस हैद्राबाद या सामन्यात चेन्नईचा आयपीएल मधील सलग तिसरा पराभव झाला होता. या सामन्यामध्ये सनरायझर्स हैद्राबादने चेन्नई सुपर किंग्जचा 7 धावांनी पराभव केला. हैद्राबादने विजयासाठी दिलेले 165 धावांचे आव्हान चेन्नई समोर होते परंतु हा भार चेन्नई सुपर किंग्सला पेलवला नाही आणि धोनीचा संघ 20 षटकात 5 बाद 157 धावा करू शकला. दरम्यान, तर चेन्नईचा सलग तिसरा पराभव होता.
अखेर सलग तीन पराभवानंतर नंतर महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जसने काल रात्री झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजबचा दहा विकेट्सने दणदणीत पराभव केला आहे. पंजाबने विजयासाठी दिलेल्या 179 धावांचे आव्हान चेन्नईने एकही विकेट न गमावता पूर्ण केले. शेन वॉटसन आणि फॅफ डु प्लेसिस या सलामीच्या जोडीने चेन्नईला विजय मिळवून दिला. अवघ्या 106 चेंडूत नाबाद 181 धावांची धमाकेदार सलामी भागीदारी केली.
महत्वाच्या बातम्या :-
- ‘ज्या दिवशी सत्तेत येऊ त्याच दिवशी कृषी विधेयकाला कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ’
- दुःखी आईची गळाभेट घेणाऱ्या प्रियांका गांधींना भाई जगतापांनी दिली वाघिणीची उपमा
- अखेर चांदोली अभयारण्यग्रस्त प्रकल्पग्रस्तांना रखडलेला उदरनिर्वाह भत्ता मिळाला
- मिशन बिगिन अगेन : रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत कार्यप्रणाली जाहीर
- लोकजनशक्ती पार्टी संस्थापक रामविलास पासवान यांची प्रकृती आणखी खालावली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
