मुंबई- हाथरसमधील प्रकरणातील पीडित तरुणीच्या कुटुंबाची काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी शनिवारी भेट घेत त्यांचे सांत्वन केले. सुमारे अर्धा तास चाललेल्या भेटीमध्ये राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबाकडून झाल्या प्रकाराबाबत माहिती घेतली. तसेच अन्यायाविरोधात उभे राहणार आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार, असं पीडित कुटंबाची भेट घेतल्यानंतर म्हटलं आहे.
मोठ्या गदारोळानंतर त्यांना हाथरस येथे जाण्याची परवानगी मिळाली होती.यापूर्वी राहुल आणि प्रियंका गांधी एकदा पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे समोर आल्यानंतर शनिवारी त्यांनी पुन्हा हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा 35 खासदारांना घेऊन ते पीडितेच्या घरी जाणार होते. यावेळी पोलिसांनी केवळ पाच जणांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली होती.
कोरोना काळात आई मुलांजवळ जायला घाबरतायत
बलात्कार पीडित मुलीच्या दुःखी आईला छातीशी लावणारी ही वाघीण, इंदिरा गांधींची नात आहे ♥️ pic.twitter.com/DRG3eFYkB3
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) October 4, 2020
गांधी बंधू भगिनीच्या झंजावातामुळे कॉंग्रेस नेत्यांच्या आशा-आकांक्षा उंचावल्या असल्याचं चित्र आहे. जेष्ठ कॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी प्रियांका यांची थेट वाघिणी सोबत तुलना केली आहे. कोरोना काळात आई मुलांजवळ जायला घाबरतायत. बलात्कार पीडित मुलीच्या दुःखी आईला छातीशी लावणारी ही वाघीण, इंदिरा गांधींची नात आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- ‘ज्या दिवशी सत्तेत येऊ त्याच दिवशी कृषी विधेयकाला कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ’
- मुंबई पोलिसांवर आणि महाविकास आघाडी सरकारवर आरोप करणारे आता तोंडघशी पडले’
- अखेर चांदोली अभयारण्यग्रस्त प्रकल्पग्रस्तांना रखडलेला उदरनिर्वाह भत्ता मिळाला
- मिशन बिगिन अगेन : रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत कार्यप्रणाली जाहीर
- लोकजनशक्ती पार्टी संस्थापक रामविलास पासवान यांची प्रकृती आणखी खालावली


