Share

अखेर चांदोली अभयारण्यग्रस्त प्रकल्पग्रस्तांना रखडलेला उदरनिर्वाह भत्ता मिळाला 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई  – कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीन जिल्हयात येणाऱ्या चांदोली अभयारण्यग्रस्त १८ वसाहतीतील ५३७ प्रकल्पग्रस्तांना ४ कोटी १९ लाख रुपयांचा रखडलेला उदरनिर्वाह भत्ता आज प्रातिनिधिक स्वरूपात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाटप केला.

दरम्यान रोजंदारीवर जाऊन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाला आता दिलासा मिळेल याबाबत मंत्री जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त केले.जिल्हा प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समस्या निवारण सप्ताह आयोजित करावा असे निर्देश यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मागील भाजप सरकारच्या काळात आम्ही अनेकदा मागणी करूनही निधी मिळाला नव्हता मात्र राज्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी स्थापित झालेल्या महाविकासआघाडी सरकारने हा प्रश्न प्राथमिकतेने मार्गी लावला याचा आनंद होतोय असे मंत्री जयंत पाटील म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी, वनविभागाचे अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!