Share

उस्मानाबाद जिल्ह्यात प्लास्मा देण्याऱ्यास पाच हजाराचे बक्षीस

Published On: 

उस्मानाबाद: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासनाने नियोजनबद्ध योजना राबवून कोरोना प्रसार थांबवावा.भैरवनाथ साखर कारखान्याच्या माध्यमातून कोरोना रुग्णासाठी लागणारे साहित्य व औषधे स्वखर्चाने पुरवठा करण्यात येईल. तसेच प्लॉझमा देण्याऱ्यास ५ हजाराचे बक्षीस देण्यात येईल, असे आश्वासन आ.तानाजीराव सावंत यांनी परंडा येथे कोरोना आढावा बैठकीत दिले.

कोरोना बाधीत रूग्णांच्या उपचारासाठी शासनाकडून मिळेल तेवढे घ्या. कमी पडल्यास आवश्यक ती मदत मी देतो पण तत्काळ प्रभावी उपाययोजना राबवून रूग्णांचे जीव वाचवा असे आवाहन सेनेचे उपनेते आ. तानाजी सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केले.आ. सावंत यांनी मंगळवारी वाशी, भूम, परंडा येथील कोरोना केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालयास भेट देवून पाहणी केली.

तसेच तहसील कार्यालयात कोरोना उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. वाशी येथील बैठकीस शिवसेना नेते प्रशांत चेडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. सावंत यांनी ग्रामसेवक व तलाठी सज्जावर राहत नसलेबाबत नाराजी व्यक्त केली. कामात हलगर्जी केल्यास निलंबन कारवाई करण्याचा इशाराही दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!