🕒 1 min read
पुणे : एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात आत्महत्या केली आहे. स्वप्निल लोणकर (वय-२४) असे त्याचे नाव आहे. स्वप्निलने फुरसुंगी परिसरातीलराहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना बुधवारी (दि.२९ जून) रोजी घडली आहे. पण त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी काल आढळून आल्याने धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात तो पास देखील झाला होता. पण, यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. याच नैराश्यातून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले.
स्वप्निलच्या आत्महत्येनं त्यांच कुटुंब दुःखात बुडालं आहे. स्वप्निलच्या मृत्यूचं वृत्त त्याची आई छाया लोणकर यांच्यासाठी मोठा आघात ठरला. स्वप्निलच्या आत्महत्येनंतर त्यांच्या आईने सरकारबद्दल संताप व्यक्त केला. ‘मला सांगा एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केली असती, तर मंत्र्यांना जाग आली असती की नाही? तसंच जरा दुसऱ्यांच्या जिवाचा विचार करा ना… दुसऱ्याच्या आईवडिलांचा विचार करा ना की, त्यांच्यावर काय परिस्थिती आली आहे.
माझ्या कुटुंबाची काय परिस्थिती आहे, हे माझं मलाच माहिती. आम्ही त्याला कसं शिकवलं? तो किती हुशार होता. हुशार होता म्हणून त्याला तिथपर्यंत पोहोचवलं. तिथपर्यंत पोहोचण्याआधी अशी मुलं आत्महत्या करतात याचा विचार सरकार का करत नाही ?,’ असा जळजळीत सवाल स्वप्निलच्या आईने सरकारला केला आहे.
मागच्या दोन वर्षांपासून स्वप्निलच्या मनावर होत असलेल्या आघातांचे अनुभव सांगत त्या माऊलीने सरकारला जळजळीत सवाल केला आहे. ‘मला माहितीये माझं पोरंग किती झुरायच, दोन वर्ष माझं पोरंग किती झुरलं, आई, इंटरव्ह्यू झाला नाही, असं म्हणायचं. मी पास झालो, इंटरव्ह्यू नाही झाला,’ असं म्हणत स्वप्निलच्या आईने हंबरडा फोडला.
महत्वाच्या बातम्या
- मराठमोळ्या शरद केळकरला मिळतायेत जीवे मारण्याच्या धमक्या ; कारण वाचून व्हाल थक्क
- ‘…यामुळे ८ वर्षे छोट्या पडद्यापासुन दुर होतो’, उमेश कामतने सांगितले खरे कारण
- ‘…तेव्हा आम्हाला सिनेमा दाखवला’, इराफाननं सांगितला द्रविड बाबतचा ‘तो’ किस्सा
- ‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’, परीक्षा पास होऊनही नोकरी न मिळाल्याने युवकाची आत्महत्या
- ‘सारेगमप’चे परिक्षक ट्रोल ; मृण्मयी देशपांडेचं सडेतोड उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
