🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: पाकिस्तान ( Pakistan ) मध्ये नव्या लष्कर प्रमुखांची ( Pakistan Army chief ) घोषणा करण्यात आली आहे. जनरल कमर जावेद बाजवा यांची जागा आता लेफ्टनंट जनरल सय्यद आसिम मुनीर (Lt. Gen. Syed Asim Munir) घेणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाद शरीफ यांनी सय्यद आसिफ मुनीर यांच्या नावाची घोषणा केली आहे. लेफ्टनंट जनरल सय्यद आसिफ मुनीर हे आयएसआयचे प्रमुख राहिलेले आहेत.
61 वर्षीय जनरल कमल जावेद बाजवा 29 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहे. बाजवा यांचा कार्यकाळ जवळजवळ 6 वर्षांचा होता. यामध्ये त्यांच्या कार्यकाळाला तीन वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. तर मुनीर यांची ऑक्टोबर 2018 मध्ये इंटेलिजन्स चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
लेफ्टनंट जनरल सय्यद आसिफ मुनीर पाकिस्तान ( Pakistan ) लष्कर प्रमुख ( Pakistan Army chief )
पाकिस्तान सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीसाठी संरक्षण मंत्रालयाकडून नावाचे पॅनल मिळाले झाले होते. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, संरक्षण मंत्रालयाकडून जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष आणि लष्कर प्रमुखांच्या नावांची एक यादी मिळाली होती. लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांची जॉईंट चीफ ऑफ स्टाफ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर लेफ्टनंट जनरल सय्यद आसिफ मुनीर यांची लष्कर प्रमुख ( Pakistan Army chief ) म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुनीर 2018-19 मध्ये 8 महिने आयएसआय प्रमुख होते. यामध्ये इमरान खानने आपल्या जवळच्या सहकारी फेज हमीदला आयएसआय प्रमुख बनवले होते तर मुनीरची गुंजरावाला कॉर्प्स कमांडर म्हणून बदली केली होती. मुनीर यांनी दोन महिन्यानंतर टू स्टार जनरल पदावर बढती मिळवली होती.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | “…तरच पुढची चर्चा होऊ शकते”, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना शरद पवारांचे खडेबोल
- Udayanraje Bhosale | “पवार-गडकरींच्या जागी मी असतो तर…”; उदयनराजेंचा खोचक टोला
- Amit Shah | “ज्याने श्रद्धाची हत्या केलीये, त्याला…”, श्रद्धा वालकर हत्याकंडावर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया
- Samantha Ruth Prabhu | समंथा प्रभू रुग्णालयात दाखल, चाहत्यांची वाढली चिंता
- Sharad Pawar | “मी काही ज्योतिष नाही…” शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
