🕒 1 min read
Sharad Pawar | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काल शिर्डी दौऱ्यावर गेले होते. यावेळी ते ज्योतिषाकडे देखील गेले. यावरुन राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्षातील नेते टीका करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना सरकार कधी पडणार, असा प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना त्यांनी शिंदेंना जोरदार टोला लगावला आहे.
दोन महिन्यात राज्य सरकार कोसळणार असल्याचं भाकीत केलं जात आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे?, असा सवाल शरद पवारांना करण्यात आला होता. यावर उत्तर देत असताना मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे सरकार कधी कोसळेल हे मी सांगू शकणार नाही, माझा त्यावर विश्वास नाही, मी दौरा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही, हल्ली आपण नवीन गोष्टी पाहात आहोत, महाराष्ट्रात जे कधी घडलं नव्हतं, ते घडत आहे, ठिक आहे, असं शरद पवार म्हणाले.
यादरम्यान, कार्यक्रम बंद करून शिर्डीला जाणं, त्यानंतर दुसरीकडे जाऊन हात दाखवणं या गोष्टी महाराष्ट्राला नवीन आहे. हे राज्य पुरोगामी आहे, विज्ञानाचा पुरस्कार करणारं राज्य म्हणून लौकीक आहे, त्या राज्यात या गोष्टी पाहायला मिळत आहेत, आत्मविश्वासाला धक्का बसतो तेव्हा लोक अशा गोष्टीकडे जातात, ज्योतिषाला हात दाखवतात, असं देखील पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Electric Scooter Launch | Komaki ची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर झाली लाँच
- Sharad Pawar | “…हे या राज्यपालांचं वैशिष्ट्ये आहे”, शरद पवारांनी घेतला राज्यपालांचा समाचार
- Dada Bhuse । “मुख्यमंत्री पूजेला गेले होते, हात दाखविण्याचा कुठलाही प्रकार झालेला नाही”; शिंदे गटाकडून स्पष्टीकरण
- Sharad Pawar | एकनाथ शिंदेंच्या ज्योतीष भेटीवर शरद पवार म्हणाले, “दौरा सोडून हात दाखवायला…”
- Vikram Gokhale | “डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत”, विक्रम गोखलेंबाबत सहकाऱ्याने दिली माहिती


