🕒 1 min read
मुंबई : देशभरात बांग्लादेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व अवैधरित्या देणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचा आरोप कांदिवली पूर्वचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. इतकंच नाही तर या टोळीमध्ये MIM च्या दोन आमदारांचा देखील सहभाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
बांग्लादेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देणारी आंतरराष्ट्रीय टोळी मुंबई पोलिसांनी पकडली असून त्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नागरिकत्व मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे MIM च्या दोन आमदारांच्या लेटर हेडचा उपयोग करून शिफारस केली जात असल्याचा गौप्यस्फोट भातखळकरांनी केला आहे.
आमदार मुफ्ती महम्मद इस्माईल आणि आमदार शेख असिफ शेख रशीद या दोन MIM आमदारांच्या लेटर हेडची प्रत या टोळीकडून पोलिसांना मिळाली असून यासोबतच रिक्त लेटर हेड देखील जप्त करण्यात आले आहेत. हे देशविघातक कृत्य असल्याने या दोन्ही आमदारांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी देखील अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
वंदे मातरमला विरोध, कलम ३७० हटवण्याला विरोध, नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध, एनआरसीला विरोध करणाऱ्या ओवैसी व त्यांच्या पक्षाने आता आपले मतदार वाढवण्यासाठी बांग्लादेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या भारताचे नागरिकत्व देण्याची मोहीम हाती घेतली आहे का? असा घणाघाती सवाल देखील अतुल भातखळकर यांनी केला आहे.
धक्कादायक…
बांग्लादेशींना नागरिकत्व मिळून देण्यासाठी वापरले MIM च्या आमदारांचे लेटर हेड…
देशाच्या सार्वभौमत्व व सुरक्षेशी अत्यंत धोकादायक खेळ करणाऱ्या देश विघातक षड्यंत्राची कसून करा, देशद्रोह्यांना अटक करा… pic.twitter.com/puYj74K4sR— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 2, 2020
MIM च्या आमदारांचा घातक खेळ…
देश विघातक षड्यंत्राची कसून चौकशी झाली पाहिजे… लाचार ठाकरे सरकार हे प्रकरण खणून काढेल काय? pic.twitter.com/Mv8anbhRp6— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 2, 2020
महत्वाच्या बातम्या
- कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला !
- रामविलास पासवान यांच्या मृत्यूची चौकशीची मागणी,चिराग पासवान यांच्या भूमिकेबद्दल संशय
- जाणून घ्या देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने का होतेय घट?
- भ्रष्टाचारी एकनाथ खडसेंना आमदार करू नका; दमानिया यांनी घेतली थेट राज्यपालांची भेट
- दिवाळीनिमित्त जनतेला मदत मिळावी ; चित्रा वाघ यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
