मुंबई : राज्यासह देशभरात उत्साहात साजरी केली जाणारी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. गेल्या आठ महिन्यात कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन मधून जनजीवन सावरत असतानाच आर्थिक घडी मात्र पूर्णपणे विस्कटली आहे.
अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले असून अनेकांना रोजगाराला मुकावं लागलं आहे. अशातच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं देखील प्रचंड नुकसान केलं. बोगस बियाणं, खतांचा तुटवडा, लॉकडाऊनमुळे कोसळलेले भाव, अतिवृष्टी यासारख्या संकटाचा सामना करत कसबस हाताशी येणाऱ्या पिकाची आशा उराशी बाळगून दिवस ढकलणाऱ्या शेतकऱ्याचं पीक देखील वाहून गेल्याने दिवाळी साजरी तरी कशी करायची असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
तर, दिवाळीत होणाऱ्या कोट्यवधींच्या उलाढालीवर देखील अनेकांची उपजीविका अवलंबून आहे. किमान घरात गोडधोड तरी कसं करणार असा सवाल गृहिणींना भेडसावत आहे. त्यामुळेच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महत्वाची मागणी केली आहे. राज्यातील जनतेला दिवाळी सणानिमित्त रवा, मैदा, साखर, तेल व तूप हे पदार्थ रास्त दरात रेशनिंगवर उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र –
‘आपल्याला कल्पना आहेच की, यावेळेची दिवाळी ही कोरोनाच्या सावटाखालीच आहे. त्यात लॉकडाउनने जनतेचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलेलं आहे. त्यामुळे दिवाळी सण कसा साजरा करावा? हा जनतेपुढे यक्ष प्रश्न आहे. या कठीण काळात घरसंसार चालवणे ही गृहिणींसाठी तारेवरची कसरत आहे.
त्यात मराठवाडा, विदर्भ, कोकण पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं आहे. या व अशा पार्श्वभूमीवर जनतेची दिवाळी गोड व्हावी यासाठी सरकारकडून दिलासा म्हणून गहू, तांदूळ, चणाडाळ सोबतचं रवा, मैदा, साखर, तेल व तूप ही रास्त भावात स्वस्त धान्य दुकान(रेशनिंग वर) उपलब्ध करून द्यावे ही विनंती. राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून आपली जबाबदारी ओळखत आपण गोरगरीब जनतेची दिवाळी गोड कराल ही अपेक्षा आहे.’ अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
सन्माननीय मुख्यमंत्री महोदय,
राज्यातील गोरगरीब जनतेची दिवाळी गोड व्हावी यासाठी स्वस्त धान्य दुकानात
(रेशनिंग वर)गहू,तांदूळ चणाडाळ सोबतचं रवा,मैदा,साखर,तेल,तूप रास्त भावात उपलब्ध करून द्या.@CMOMaharashtra @ChhaganCBhujbal @Dev_Fadnavis @mipravindarekar pic.twitter.com/0s6caCdz6H— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 2, 2020
महत्वाच्या बातम्या
- दुर्देवाने राज्य सरकार कुठल्याच विषयात गंभीर नाही – प्रविण दरेकर
- भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीत आणि उत्पन्नात सातत्याने होतेय भरघोस वाढ
- पंचनाम्याचे दुस-यांदा नाटक कशासाठी..? शेतकऱ्यांना सरसकट मदत करा-भाजपा
- भ्रष्टाचारी एकनाथ खडसेंना आमदार करू नका; दमानिया यांनी घेतली थेट राज्यपालांची भेट
- काँग्रेसला नाराजीचा मोठा धक्का ! ‘हा’ दिग्गज नेता स्थापन करणार नवा पक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

