Share

कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला !

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. यानंतर जूनपासून टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात आले असून सद्या नोव्हेंबर अखेरपर्यंत अनलॉक-५ ची नियमावली लागू करण्यात आली आहे. एकीकडे शाळा-कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असतानाच खाजगी कोचिंग क्लासेसला देखील अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानासह कोचिंग क्लासेसवर अवलंबून असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देखील आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे, आता ग्रंथालये सुरु करण्यापाठोपाठ कोचिंग क्लास पुन्हा सुरु करण्यासाठी कोचिंग क्लास चालक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज पालक संघ आणि कोचिंग क्लासेस मालक – शिक्षकांचे शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर ही भेट झाली.

कोचिंग क्लास चालकांच्या या मागण्या राज ठाकरेंनी सरकार दरबारी मांडाव्यात अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. यापूर्वी डॉक्टर, जिम मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. अनेक अडचणी राज ठाकरेंच्या भेटीनंतर दूर होत असल्याने न्याय कृष्णकुंजवर मिळतो अशी भावना देखील मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!