Share

रामविलास पासवान यांच्या मृत्यूची चौकशीची मागणी,चिराग पासवान यांच्या भूमिकेबद्दल संशय

Published On: 

पाटणा : केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचं 8 ऑक्टोबर संध्याकाळी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. दिल्लीतल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर 8 ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, पासवान यांच्या निधनानंतर आता पक्षांची सर्व सूत्र त्यांचे चिरंजीव चिराग पासवान यांच्याकडे आली आहेत. दरम्यान, आता हिंदुस्थान अवाम मोर्चाने पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून रामविलास पासवान यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, चिराग पासवान यांच्याबद्दल अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात आलेले आहेत.

रामविलास पासवान यांच्याशी संबंधित कोणती गुपिते लपवली जात आहेत हे देशाला जाणून घ्यायचे आहे, असे हिंदुस्थान अवाम मोर्चाचे दानिश रिझवान यांनी विचारले आहे. रामविलास पासवान यांच्या मृत्यूसंदर्भात असे अनेक प्रश्न आहेत ज्यांद्वारे चिराग पासवान यांच्याकडे संशयाची सुई जाते, असे रिझवान यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री असलेले रामविलास पासवान हे रुग्णालयात उपचार घेत असताना कोणाच्या सांगण्यावरून रुग्णालयाने मेडिकल बुलेटीन जारी केले नाही, असा सवाल दानिश रिझवान यांनी विचारला आहे.कुणाच्या सांगण्यावरून रुग्णालय प्रशासनाने उपचार घेत असलेल्या रामविलास पासवान यांना रुग्णालयात केवळ तीन जणांनाच भेटण्याची परवानगी दिली होती? याशिवाय अनेक असे प्रश्न आहेत की ज्याचे उत्तर रामविलास पासवान यांच्या समर्थकांसह त्यांच्या नातलगांना जाणून घ्यायचे आहेत. ज्याची चौकशा आवश्यक आहे असे देखील सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!