Share

अभिषेक बॅनर्जींच्या पत्नीची EDच्या चौकशीला दांडी; पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

Published On: 

कोलकाता – अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजीरा बॅनर्जी यांना कोळसा तस्करी प्रकरणात समन्स पाठवले आहे. याशिवाय बंगाल सीआयडीचे एडीजी ज्ञानवंत सिंग आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचे वकील संजय बसू यांनाही समन्स पाठवण्यात आले आहे.मात्र अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा यांनी एक पत्र लिहून अंमलबजावणी संचालनालयासमोर (ED) हजर राहण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.

अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीला समन्स जारी करून चौकशीसाठी दिल्लीत बोलावले होते. रुजिरा बॅनर्जी यांना आज म्हणजेच 1 सप्टेंबरला ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते, तर अभिषेक बॅनर्जी यांना 3 सप्टेंबरला बोलावण्यात आले होते. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोलकाता येथील आपल्या निवासस्थानी येऊन चौकशी करावी असं सांगत रुजिरा यांनी ईडीचे सहाय्यक संचालक सुमत प्रकाश जैन यांना हे पत्र लिहिले आहे.

रुजीरा बॅनर्जी यांनी या पत्रात नेमकं काय म्हटले आहे ?

18 ऑगस्ट 2021 रोजी आलेल्या समन्समध्ये मला 1 सप्टेंबरला नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले गेले आहे. मी दोन मुलांची आई आहे आणि सध्याच्या साथीच्या काळात एकट्याने नवी दिल्लीला प्रवास केल्यास मला आणि माझ्या मुलांना धोका निर्माण होऊ शकतो.

रुजिरा म्हणाल्या,  जर आपण मला कोलकात्यातील माझ्या निवासस्थानीच उपस्थित राहण्यास सांगाल, तर ते माझ्यासाठी सोयिस्कर होईल. कारण आपल्या संस्थेचे कार्यालयही कोलकात्यातच आहे आणि मीही कोलकात्यातच राहते. याशिवाय, माझ्या मते, आपल्या तपासाचा विषय आणि कारवाईचे कथित कारणही पश्चिम बंगालशी संबंधितच आहे. आपण आपला निर्णय अवश्य कळवावा. मी आपल्याला माझ्या बाजूने संपूर्ण सहकार्याचे आश्वासन देते, असेही रुजिरा यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!