Share

मराठा आरक्षणासाठी राजकारण बाजूला ठेवून प्रयत्नशील राहू : देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई : स्थानिक स्वराज संस्थेतील ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. हा महाविकास आघाडी सरकारला नार्केतपणा आहे. ज्यावळी ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत होता तेव्हा यांचे मंत्री मात्र आंदोलन करण्यात गुंग होते. ओबीसीची जनगणना केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही, हे जे बोलले जाते ते खोटे आहे’ अशी घणाघाती टीका भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठीही आपण तयार असल्याचे म्हणत यासाठी कोणासोबतही चर्चा करु. राजकारण मागे ठेवून यासंदर्भात आम्ही चर्चा करु, पण यावेळी समोरच्यांनीही राजकारण करु नये असा स्पष्ट आग्रही सूर त्यांनी आळवला असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

तसेच ‘4 मार्चला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की ओबीसी समाजाला मिळालेले राजकीय आरक्षण रद्द केले आहे. त्यानंतर टाकलेल्या पुनर्विचार याचिका रद्द केली. त्यानंतर या सरकारने वेळ वाया घालवला. यातील एक भाग असा होता की ज्या जिल्ह्यात 50 टक्केच्या आरक्षण होते ते कमी करा अशी याचिका होती. कृष्णमूर्ती यांच्या अहवाल प्रमाणे ते 27 टक्के राहू शकत नाही. आमच्या सरकारच्या काळात आम्हाला लक्षात आल की त्यामुळे 120 जागा बाधित होत होत्या. त्यावेळी 90 जागा आम्ही वाचवू शकतो, इतरांसाठी आम्ही वेळ मागितली. त्यावेळी आम्ही ते वाचवले,’ असा दावा फडणवीसांनी केला.

तसेच ;खोटं बोलण्याची स्पर्धा जगात भरवली गेली, तर पहिल्या दहामध्ये हेच येतील, असे म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर टीका केली. मराठा आरक्षणामागोमाग आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही हे नेते खोटं बोलत असल्याचे सांगत आपले म्हणणे कोणीही गांभीर्याने घेतले नाही.’ अशी नाराजी तीव्र शब्दांत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!