Share

अखेर तो दिवस आला ! ऑस्ट्रेलियन खेळाडूंची बऱ्याच महिन्यानंतर कुटुंबाशी भेट ; पहा भावुक करणार व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशभरात कोरोनाचा कहर वाढत असताना आयपीएल १४ चे पर्व सुरु होते. मात्र आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यांनतर बीसीसीआयने आयपीएल स्थगितीचा निर्णय घेतला त्यानंतर भारतात आयपीएल साठी आलेले खेळाडू आपल्या मायदेशी परतले. आयपीएलच्या 14 व्या मोसमात खेळलेले सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मालदीवमध्ये राहावे लागले. कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाने 15 मे पर्यंत भारताकडून येणाऱ्या उड्डाणावर बंदी घातली होती. ऑस्ट्रेलियन सरकारच्या या निर्णयामुळे खेळाडूंना मालदीवमध्ये राहावे लागले.

मालदीवमध्ये 14 दिवस क्वारंटाइन राहिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आपल्या मायदेशी परतले होते. पण खेळाडूंना मायदेशी परतल्यानंतर लगेच घरी जाण्यास परवानगी मिळाली नव्हती. त्यांना सिडनीतील हॉटेलमध्ये 10 दिवस क्वारंटाइन राहावं लागलं. अखेर काल या खेळाडूंनी विलगीकरणाच्या नियमांचे पालन करुन 26 दिवसांनी 30 मे रोजी त्यांची कुटुंबियांशी भेट झाली. या भेटीदरम्यान सर्वच खेळाडू कमालीचे इमोशनल झाले होते. त्यातील कोलकाता नाईट रायडर्सच्या पॅट कमिन्सचा भावुक झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या बराच व्हायरल होत आहे.

डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स अशा दिग्गज खेळाडूंसोबत ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू जे आयपीएलमध्ये कॉमेन्टीटर किंवा कोच म्हणून आले होते. ते देखील आयपीएल स्थगितीनंतर मायदेशी परतले. हे सर्वजण सिडनीतील एका हॉटेलमध्ये विलगीकरणात होते. अखेर 30 मे रोजी सर्वजण आपल्या घरातल्यांना भेटले. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!