औरंगाबाद : देवगिरी किल्ला माजी खासदार तथा नेते चंद्रकांत खैरे अगोदर चढतात की ? मी अगोदर चढतो असे आव्हान माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडेंनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिले. चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हरिभाऊ बागडे यांना भारतीय जनता पक्षाच्या कायद्यानुसार ७० री आेलांडलेली आहे. त्यांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी असा सल्ला दिला होता.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीदरम्यान शेतकरी विकास पॅनलची स्थापना केली आहे. खैरे यांनी ३० एकर शासकीय जागा घेऊन सैनिकी शाळा उभारली. या संस्थेतील किती विद्यार्थी पोलिस, सैन्यदलात गेले हे जाहीर करावे, असे आवाहनही बागडे यांनी करत खैरे यांच्यावर प्रती प्रस्न विचारला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे, सुभाष झांबड यांच्या पॅनलला जाहीर पाठिंबा दिला. बागडे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांच्यावर तोफ डागली होती. यास शेतकरी विकास पॅनलतर्फे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार बागडे बोलत हाेते. देवगिरी बँक, छत्रपती संभाजी साखर कारखान्याबरोबरच मी शिक्षणसंस्थेची स्थापना केलेली आहे. तर शिक्षणसंस्थेचा मी ३५ वर्षांपासून अध्यक्ष आहे. मात्र, संस्थेत माझ्या कुटुंबातील कोणीही नोकरी करीत नाही तसेच मंडळावर देखील मी घेतलेले नाही.
याउलट चंद्रकांत खैरे यांचे असल्याचे सांगत विश्वस्त मंडळात घरातील सदस्य आहे, भाजपच्या ७५ वयोगटाच्या काही नियम आहे म्हणे, असा टोला मात्र खैरे यांनी बागडे यांनी आता थांबले पाहिजे, असा सल्ला दिला होतो. त्याचा बागडे यांनी चांगलाच समाचार घेतला. वयापेक्षा माणसाची कार्यक्षमता व बौध्दिक क्षमता महत्त्वाची असते असे त्यांनी स्पष्ट करत खैरे यांनी माझ्यासोबत देवगिरी किल्ला चढण्याची स्पर्धेत सहभागी व्हावे, कोण थकतं ते पाहू, असे खुले आव्हानही बागडे यांनी खैरे यांना या वेळी दिले. गुरुवारी कल्याण काळे म्हणाले की, दूध संघाच्या ठेवी जिल्हा बँकेतून काढून जनता बँकेत ठेवल्या. या आरोपात काहीही तथ्य नसल्याचेही बागडे यांनी सांगितले.
विरोधी शेतकरी सहकार विका पॅनलमधील उमेदवार जगन्नाथ काळे यांनी प्रेरणा बँकेत कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तींना सभासद करून घेतला. तर हा सहकार कायद्याचा भंग केल्याचा आरोपही बागडे यांनी या वेळी केला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे, संचालक अभिजित देशमुख यावेळी उपस्थित होते. आज दिवसभर गुरुवारची खैरेंची पत्रकार परिषद आणि शुक्रवारची हरिभाऊ बागडेंची पत्रकार परिषदया विषयी खुप चर्चा देखील होती.
महत्त्वाच्या बातम्या
- इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पृथ्वीला संधी नाहीच
- राज्य सरकारचे ओबीसींच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष, चंद्रशेखर बावनकुळे उतरणार रस्त्यावर
- अक्षयकुमारने ‘ रामसेतू’ चित्रपटचा आयोध्येतून केला शुभारंभ
- विमाक्षेत्रात एफडीआयचे प्रमाण ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के इतके वाढवले
- गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला !


