Share

‘चला रोजच मोदींचा वाढदिवस साजरा करुया, कारण लसीकरणाचा हाच एकमेव मार्ग उरलाय’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कॉंग्रेसने सतत मोदी सरकारवर निशाना साधला आहे. आता कॉंग्रेसने लसीकरणावरून पुन्हा एकदा मोदींवर निशाना साधत टीका केली आहे. ‘चला आता रोजच मोदींचा वाढदिवस साजरा करुया, कारण सर्वांचे लसीकरण करण्याचा तो आता एकमेव मार्ग उरलाय, हो ना? असा सवाल करत कॉंग्रेसने ट्वीट करत टीका केली आहे.

दरम्यान शुक्रवारी (17 सप्टेंबर) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता. या दिनाचे औचित्य साधून देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. शुक्रवारी देशात एकाच दिवशी कोरोना लसीचे 2.5 कोटीहून अधिक डोस देण्यात आले. देशात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत चार वेळा एकाच दिवशी एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर यावरूनच कॉंग्रेसने मोदींचा वाढदिवस हाच लसीकरणाचा एकमेव मार्ग असल्याचे म्हटले आहे.

https://twitter.com/INCMaharashtra/status/1440224278473940997

तसेच केंद्रातील विरोधी पक्षानेही यावर बरीच टीका केली आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांनी या विक्रमाला एका पक्षाला ताप आला असे म्हणत त्यांनी काँग्रेसवला अप्रत्यक्ष टोला हाणला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!