Share

तळी उचलण्याची सवय असलेल्यांना तळी उचलू द्या आम्ही लोकांची सेवा करू, नारायण राणेंचा सेनेवर हल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यावर नैसर्गिक आपत्ती बळावली आहे. या आपत्तीत विरोधी पक्षाकडून सेनेवर सतत वार केले जात आहेत. कधी मदतीवरून तर कधी दौऱ्यावरून या सर्व चर्चांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातून सडकून उत्तर दिले आहे. २७ जुलैच्या सामना अग्रलेखात त्यांनी विरोधी पक्ष्याच्या राजकीय दौऱ्यांना ‘पर्यटन’ ची उपमा देत चांगलेच धारेवर धरले. त्यावरच आता भाजपचे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी चांगलेच प्रतिउत्तर दिले आहे.

जनता आता समोर येऊन राग व्‍यक्‍त करु  लागल्यामुळे शिवसेना हादरुन गेली व यामुळेच सामना मध्‍ये एकाच विषयावर लागोपाठ दोन दिवस अग्रलेखातून जळफळाट झाला. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि लोकहित जोपासणे याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही हेच यावरुन सिध्‍द होते.लोकांच्या संकटाचे राजकारण आम्ही करत नाही. मोटार चालविण्याचे कौतुकही करुन घेत नाही. अशा प्रसंगी तळी उचलण्याची सवय असलेल्यांनाच तळी उचलू द्या, असा टोला लगावत आम्ही लोकांची सेवा करू असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी चिपळूणच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केलेला संताप यावरही सामन्यात भाष्य केले आहे. ज्यांनी निसर्गकोपात सर्वस्व गमावले त्यांच्या संतापाचा स्फोट झालाच तर राज्यकर्त्यांनी तो समजून घेतला पाहिजे. त्यामुळे अशा वेळी संयम आणि समन्वय ठेवणे गरजेचे असून विरोधी पक्षाने मढय़ावरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करू नये असा सुतोवाच दिला आहे. यावरच नारायण राणे यांनी सडेतोड प्रतिक्रिया देत प्रतिउत्तर दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!