🕒 1 min read
मुंबई: देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठा विजय मिळवला. त्या निकालाचा दाखला देत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार केला. ‘देगलूरमध्ये आज निकाल लागला. तिथे महाविकास आघाडीच्या उमेदवारापुढे भाजपची कशी धूळधाण उडाली हे सगळेच पाहत आहेत. त्यामुळे निवडणुकांना आम्ही घाबरत नसून पुन्हा निवडणूक घेतली तर राज्यात भाजपचे १०५ आमदार आहेत ती संख्या ४० वर येईल’, असा सणसणीत टोला जयंत पाटील यांनी लगावला. आता यावरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जयंत पाटील यांचे आव्हान स्वीकारले आहे.
पुन्हा निवडणूक घेतली तर राज्यात भाजपचे १०५ आमदार आहेत ती संख्या ४० वर येईल’, असे जयंत पाटील म्हणतात. चला, स्वीकारले आव्हान. होऊन जाऊ दे… दूध का दूध और पानी का पानी असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
पुन्हा निवडणूक घेतली तर राज्यात भाजपचे १०५ आमदार आहेत ती संख्या ४० वर येईल', असे जयंत पाटील म्हणतात.
चला, स्वीकारले आव्हान. होऊन जाऊ दे… दूध का दूध और पानी का पानी। pic.twitter.com/2DHFefQgAj— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 3, 2021
दरम्यान चंद्रकांत पाटील यांचं विधान पाहता त्यांना सत्ता मिळवण्याची घाई झाली आहे. त्यासाठी सगळी धडपड चालली आहे. त्यातूनच धाडी आणि अटकसत्र चालवलं आहे. पण हे काही आता नवीन राहिलेलं नाही, असे सांगत भाजपने भानावर यावं आणि समर्थ व स्वच्छ विरोधी पक्ष म्हणून काम करावं, असं आवाहनही जयंत पाटील यांनी केले होते. त्यावरच भातखळकर यांनी पाटलांचा समाचार घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही’
- ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री ठाकरे
- देगलूरचा विजय म्हणजे जनतेचा आघाडीवरील विश्वास- नाना पटोले
- पराभवानंतर सुभाष साबने यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
- एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी परिवहनमंत्र्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा – दिलीप धोत्रे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
