Share

‘मला घरी जाऊ द्या, मला माझ्या आई-बाबांकडे जायचे आहे’; केजच्या कोविड सेंटरमधील मुलीची आर्त हाक

Published On: 

🕒 1 min read

बीड: ‘मला घरी जाऊ द्या, मला इथे जेवण मिळत नाही,’ असे म्हणत ‘मला माझ्या आई-बाबांकडे जायचे आहे’, अशी आर्त हाक केज तालुक्यातील पिसेगाव कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या एका बालिकेची आहे. कोविड सेंटर वरील जेवण चांगले नाही किंवा वेळेवर जेवण न मिळण्याचे अनेक प्रकार आपण ऐकले आहेत. असाच प्रकार केज येथील पिसेगाव व शारदा इंग्लिश स्कूलमधील कोविड सेंटरमध्ये घडला आहे.

केज येथील पिसेगाव व शारदा इंग्लिश स्कूलमधील कोविड सेंटर मध्ये जेवण, नाष्टा वेळेवर मिळत नाही. यामुळे येथील उपचार घेत असलेल्या रुग्णांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जेवण व नाश्ता वेळेवर मिळत नसल्याचे तसेच जेवण चांगले मिळत नसल्याच्या तक्रारी करूनही जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली नाही. या दोन्ही कोविड सेंटरला जेवण व नाष्टा पुरवणाऱ्या कंत्राटदाराला बदलण्याची मागणी केली आहे. तरीही यात काहीही बदल झाला नाही.

शनिवारी पिसेगाव येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या एका छोट्या मुलीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिने या व्हिडिओत ‘जेवण मिळत नसून, इथे जेवण नाष्टा याची काहीही सोय नाही. मला माझ्या आई-बाबांकडे जाऊद्या. मला इथून सोडा’, अशी आर्त हाक दिली आहे. दरम्यान आरोग्य प्रशासनाने देखील तहसीलदार यांच्याकडे १४ एप्रिल रोजीच संबंधित कंत्राटदाराची तक्रार केली असून तहसीलदारांनीही वरिष्ठांकडे याबाबत कळवले आहे. मात्र अद्यापही ‘वरिष्ठां’कडून यात काही सुधारणा झाली नाही. त्यामुळे आता या मुलीच्या तरी भावनेचा विचार ‘वरिष्ठ’ करतील का? असा सवाल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांतून केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!