मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेला संबोधित करत आहेत. राज्यातील 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर 11 जिल्ह्यात अद्यापही लेवल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. तसेच मुंबईच्या लोकलबाबत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंनी मोठी घोषणा केली आहे.
मुंबईकरांची लाईफलाईन असणारी मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी १५ ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यातही ज्यांनी लस घेवून १५ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना हा प्रवास करता येणार आहे. यासाठी एक अॅप देखील असणार आहे त्यावर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. तसेच महापालिकेच्या विभागीय कार्यालयात देखील हा पास मिळणार आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 8, 2021
तसेच राज्यातील निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी पूरग्रस्त जिल्ह्यांमधील कोरोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ‘पूर येण्याआधी देखील कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची आकडेवारी ही अधिक होती. आता पुरानंतर इतर रोगराईसह कोरोनाचा धोका देखील वाढला आहे. यासह सोलापूर, पुणे, अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये देखील अजून कोरोना रुग्ण हे शेकड्यावर सापडत असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्या’ उचापात्याकारांना जनतेने जुमानले नाही, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका
- अखेर पुणेकरांची मागणी मान्य; सर्व दुकाने व सेवा रात्री ८ पर्यंत सुरु, तर शनिवार-रविवारी…
- युवकांनो सावधान ;डेल्टा व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका तरुणांना
- आरटीई प्रवेश प्रक्रियेत बेकायदेशीरपणे प्रवेश होत असल्यास चौकशी व्हावी; पालक संघाची मागणी!
- ‘ती फक्त ट्रायल होती, त्यात एवढं काय भडकायचं ?,’ अजित पवारांचा भाजप नेत्यांना सवाल


