Share

विमानाच्या चाका खाली लिंबू ! शरद पवार झाले निशब्द

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विजयादशमीचा मुहूर्त साधत भारताच्या हवाई दलात राफेल लढाऊ विमान हे दाखल झाले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत फ्रान्स येथे राफेल विमान हास्तंतरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राजनाथसिंह यांनी आपल्या संस्कृती प्रमाणे राफेल विमानाचे पूजन केले. तर विमानाच्या चाका खाली लिंबू ठेवण्यात आले. यावरून राजनाथसिंह यांना चांगलाचं ट्रोल करण्यात आले आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी या कृतीवर काय बोलायचं बोलायला शब्दचं नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले की, सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी राफेल विकत घेण्याच्या निर्णयाबद्दल मला कोणतीही शंका नाही. पण मी वाचलं आहे, ते खरं आहे की नाही मला माहिती नाही परंतू, नव्याने खरेदी केलेल्या ट्रकवर नजर लागू नये म्हणून लिंबू-मिरची लटकवल्याप्रमाणे राफेल लढाऊ विमानाबाबतही असे केले जात असेल तर आपण काय बोलणार.

विज्ञानयुगात अजूनही अशी कृत्य केली जात आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री राजनाथसिंह चांगलेचं ट्रोल झाले आहेत. यावर अंध श्रद्धा निर्मुलन समितीने देखील प्रतिक्रिया दिली होती. विमानाच्या चाका खाली लिंबू वगैरे ठेऊन आपण चुकीच्या परंपरेचे पालन करत आहोत, असे मत मिलिंद देशमुख यांनी मांडले आहे. मुळात म्हणजे विमानाच्या उड्डाणा वेळी चाका खाली लिंबू ठेवले आहे की नाही याबाबत शहानिशा केली पाहिजे. जर तसे असले तर हे खूप मोठे दुर्दैव आहे, असे देशमुख म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1182222450769027072?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182221586314608640?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182221401505161217?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!