Share

Viral Video : हॉटेलमध्ये नाना पटोलेंच्या खांद्यावर महिलेचं डोकं असलेला व्हिडीओ, चित्रा वाघ यांचं ट्विट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात घालून खुर्चीवर बसल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाना पटोले या व्हिडीओमुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

पटोले यांचा एका महिलेच्या खांद्यावर हात टाकून बसलेला एक तथाकथित व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून त्यावरून त्यांना आता प्रश्न विचारण्यात येत आहेत. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून हा व्हिडीओ शेअर करत नाना पटोले यांना, ‘काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं’ असा प्रश्न विचारला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर एक पत्रकार परिषद देखील घेतली. नाना पटोले यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याने लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी याबाबत समोर येऊन भूमिका मांडावी असे चित्रा वाघ म्हणाल्या.

दरम्यान, नाना पटोले यांना विचारपूस केली असता त्यांनी हे भाजपाचे कट कारस्थान असल्याचा आरोप नाना पाटोले यांनी केला आहे. त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे नाना पटोले यांनी केला आहे. यावर कायदेशीर बाबी आमची लीगल टीम तपासत आहे, असे नाना पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!