🕒 1 min read
अफगाणिस्तान: गेल्या दशकांतील अफगाणिस्तानमध्ये सर्वात मोठी अनिश्चततेची परिस्थिती असून युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधील आपल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी विविध देशांचे प्रयत्न सरु आहेत. यातच अफगाणी चित्रपट निर्मात्या आणि छायाचित्रकार रोया हैदरी यांनी देश सोडून जात आहे. मात्र देश सोडत असताना तिने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
रोया हैदरी यांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘आवाज उठवणं सुरु ठेवण्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य, माझं घर सोडलं. पुन्हा एकदा, मी माझ्या मातृभूमीतून पळ काढत आहे. पुन्हा एकदा, मी शून्यापासून सुरुवात करणार आहे. मी फक्त माझे कॅमेरा आणि एक एक मृत आत्मा घेऊन महासागराच्या पलिकडे निघाले आहे. परत भेट होईपर्यंत हे मातृभूमी जड अंतःकरणाने तुझा निरोप घेते’, अशी भावनिक पोस्ट तिने शेअर केली आहे. तिच्या या पोस्टकडे सर्वांनाच लक्ष केंद्रित झाले आहे.
https://twitter.com/heydari_roya/status/1430883632168816642?s=20
हि पोस्ट शेअर करत रोयाने काबूल विमानतळावरील तिचा फोटो शेअर केला आहे. या तिने मास्क घातला असला तरी त्यांच्या नजरेत मातृभूमीला सोडून जाण्याचं दु:ख देखील दिसत आहे. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानातून दररोज हृदयद्रावक व्हिडिओ समोर येत आहेत. आता स्फोटानंतर याची दाहकता किती आहे याचे देखील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर देशाबाहेर जाण्यासाठी लाखो नागरिकांचा गोंधळ सुरू असतांनाच गुरुवारी(२६ ऑगस्ट) काबूल विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत ६० जण ठार झाले असून, जवळपास १४० लोकं जखमी झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंना दणका; ईडीने केली ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
- ‘अफगाणिस्तानातील हिंदू, शिखांना स्वीकारले; मला नाही’, महिला खासदाराची नाराजी’
- शिवेसनेबद्दल काही त्यांनी वक्तव्य केलं तर आम्ही सोडणार नाही; राजन साळवी यांचा इशारा
- योद्धा पुन्हा मैदानात…राणेंची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरु होणार
- ‘राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाखांचे बक्षीस’, विश्व हिंदू सेनेच्या अध्यक्षांचे वादग्रस्त विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
