Share

सॅमसंगच्या एम श्रेणीमधील आणखी एक स्मार्टफोन लाँच जाणून घ्या वैशिष्ट्ये

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: सध्या आठवड्याला नवनवीन अद्ययावत स्मार्टफोन लाँच होत आहेत. यामध्ये चीनी कंपन्यांसह इतर कंपन्या देखील आघाडीवर असतात यामध्ये आता दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे. सॅमसंगने नवीन एम-श्रेणीमधील गॅलक्सी एम १२ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सेलचा क्वाड कॅमेरा सेटअप आणि ९० हर्टझ रिफ्रेश रेट डिसप्ले आहे.सॅमसंग गॅलक्सी एम १२ हा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ४जीबी रॅम +६४ जीबी स्टोअरेजचा स्मार्टफोन हा १०,९९९ रुपयांना आहे. तर ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरजेचा स्मार्टफोन हा १३,४९९ रुपयांना आहे. गॅलक्सी एम श्रेणी लाँच होऊन दोन वर्ष पूर्ण झाल्याचे सॅमसंग इंडियाचे मोबाईल मार्केटिंग प्रमुख आणि वरिष्ठ संचालक आदित्य बाबर यांनी सांगितले. ग्राहकांच्या मुलभूत गरजा लक्षात घेऊन हे मॉडेल लाँच करण्यात आले आहे.

नवीन गॅलक्सी एम१२ मध्ये नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट केल्याचही बाबर यांनी माहिती दिली.सॅमसंग गॅलक्सी एम १२ ६.५ इंच एचडी + (७२०x १,६०० पिक्सेल्स) टीएफटी इनफिनिटी व्ही डिसप्ले हा २०:९आहे.स्मार्टफोनला एक्सिनोस ८५० एसओसी आणि ६ जीबी रॅम आहे. तर इंटरर्नल स्टोअरेजची क्षमता ही १२८ जीबीपर्यंत आहे.सॅमसंग गॅलक्सी एम १२हे डिव्हाईस अँड्राईडवर आधारित यूआ कोअर ओएस आणि नॅनो ड्यूल सीमवर चालते.क्वाड कॅमेरा सेटअप आहे.

त्याचबरोबर त्यामध्ये ४८ मेगापिक्सेलचे प्रायमरी सेन्सर आणि एफ/२.० अपेर्ट्यूर, ५ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड सेन्सर, २ मेगापिक्सेलचे मॅक्रो सेटअप आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे.स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.स्मार्टफोनमध्ये ६,००० एमएएच बॅटरी आहे.गॅलक्सी एम १२ मध्ये ४जी एलटीई, वाय-फाय ८०२.११ बी/जी/एन, ब्ल्यूटूथ ५.०, जीपीएस, ए-जीपीएस, यूएसबी टाईप-सी आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!