Share

‘महाविकास आघाडीतील नेत्यांना केंद्र सरकारच्या नावाने कावीळ झालाय’, फडणवीसांचा टोला

Published On: 

नागपूर : बैलगाडी शर्यतीवर न्यायालयाची बंदी असतानाही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी पोलिसांना गुंगारा देत शुक्रवारी पहाटे आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे बैलगाडी शर्यत पार पाडली. गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीवरून राज्य सरकारला धारेवर धरलेले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते शर्यतीवरून केंद्राकडे बोट दाखवत आहेत.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केंद्र सरकारने शर्यत बंदीचा निर्णय मागे घ्यावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. यावर विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना केंद्राच्या नावाने कावीळ झाल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

ते म्हणाले, ‘आमच्या सरकारच्या काळात बैलगाडी शर्यतीसंदर्भात कायदा केला होता. दुर्दैवाने त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. पण ती मागे घेण्यासाठी या सरकारनं कोणतीही पाऊले उचलली नाहीत. राज्य सरकारनं लोकांच्या भावना समजून घ्याव्यात. परंतू महाविकास आघाडीच्या नेत्यांना काहीही झाले तरी केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय लागलेली आहे. त्यांना केंद्र सरकारच्या नावाने कावीळ झाला आहे.’

नारायण राणे यांनी गुरुवारी मुंबईत बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट दिली. यानंतर काही स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केल्याचं समोर आलं. यावरून भाजपाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ज्या लोकांनी हे केलं असेल, त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलीच नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे, एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार आहे. अशा प्रकारे वागणं हे योग्य नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेऊन त्यांच्या समाधीवर कुणी जात असेल, तर ती समाधी अपवित्र झाली असं सांगता. ही कृती अतिशय अयोग्य आहे, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!