Share

“विधानसभेची निवडणूक होईल तेव्हा आशाताईंना आपण आमदार झालेले पाहू”

Published On: 

🕒 1 min read

पुणे : शिवसेनेच्या नेत्या आणि पुणे जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

आशा बुचके यांना शिवसेनेत न्याय मिळाला नाही. पण भाजपमध्ये त्यांचा सन्मान राखला जाईल आणि त्यांना न्यायही मिळेल. जेव्हा विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळी त्यांना आमदार झालेले पाहू, असा विश्वास व्यक्त करत चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आपल्याला मोकळा श्वास घेतल्यासारखे वाटत असल्याचं आशा बुचके यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर सांगितले होते. त्याच मुद्द्याला धरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

राज्यात भाजपविरोधात तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर तिन्ही पक्षांची कोंडी होत आहे. त्यामुळे भाजपला पक्षविस्ताराची संधी निर्माण झाली आहे. युतीमध्ये असताना भाजपला पक्षविस्ताराला संधी मिळत नव्हती. आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात मोकळ्या श्वासाने पक्षाचे काम करू आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर भाजपला सत्तेवर आणू, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

आशा बुचके यांच्यासारख्या कार्यकर्त्या सत्तारूढ पक्षातून भाजपमध्ये येतात ही स्वबळावरील विजयाची नांदी आहे. बुचके यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांचा पक्षात सन्मान केला जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!