🕒 1 min read
औरंगाबाद : शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जमीन खरेदी प्रकरणात विरोध दर्शवला होता. त्यामुळे हे वातावरण चांगलेच तापले होते. बाजार समितीने हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीच्या सभापतींनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस व काही संचालकांच्या विरोधामुळे हा व्यवहार फिस्कटल्यातच जमा आहे.
वैजापूर बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये नागपूर मुंबई महामार्गावर वाहनतळासाठी जवळपास पावणे दोन कोटी रुपये खर्चुन जमीन खरेदी करण्याचा निर्णय धोरणात्मक नसल्याचे माजी आमदार आर.एम.वाणी यांनी स्पष्ट केले. त्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वाखाली आठ संचालकांनी वाणींच्या भुमिकेस समर्थन दिल्याची माहिती सोमवारी परदेशी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत देण्यात आली. बाजार समितीचे सभापती भागिनाथ मगर, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनीही पाठिंब्याचे निवेदन दिले आहे.
वैजापूर बाजार समितीचे नागपूर मुंबई महामार्गावर कांदा मार्केट असुन खरेदीच्या हंगामात तालुक्यासह अन्य ठिकाणाहुन मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने वाहनांच्या रांगा लागतात. सध्याची जागा अपुरी असल्याने कांदा मार्केटजवळच आणखी पाच एकर २२ गुंठे जमीन वाहनतळासाठी खरेदी करण्याचा निर्णय २९ जुलै रोजी झालेल्या बैठकीत सभापती मगर यांच्या नेतृत्वाखाली बारा संचालकांनी घेतला होता.
या व्यवहारासाठी जमीन मालकास एक लाख ११ हजार रुपयांचा इसार देण्यात आला. मात्र इसार पावती झाल्यानंतर माजी आमदार वाणी यांचा मुलगा देविदास वाणी यांनी या व्यवहारात गैरव्यवहार असल्याची तक्रार सहाय्यक निबंधकांकडे केली. याशिवाय स्वतः वाणी यांनी परदेशी, चिकटगावकर यांना फोन करुन हा सौदा व्यवहार्य नसल्याने रद्द करण्याबाबत सुचवले होते. त्यांचा आदर राखत दोघांनीही जमीन खरेदी करण्याचा निर्णय रद्द करण्यास सहमती दशवली. त्यामुळे जमीन खरेदीचा व्यवहार फिस्कटला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दुसऱ्या बाळाच्या नावावरून करीना कपूर सोशल मीडियावर ट्रोल
- ‘स्वबळा’च्या घोषणेनंतर आणि प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे घेतल्यानंतर नाना पटोले प्रथमच औरंगाबादेत!
- संत-महंतांच्या भूमीत या सरकारने संस्कृती आणि परंपरेचा सत्यानाश केलाय – चंद्रकांत पाटील
- ‘लोकउपयोगी कामे केली म्हणून गुन्हा माफ होत नाही’ ; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- प्रवाशांना दिलासा! नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेस पुन्हा धावणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
