🕒 1 min read
नवी दिल्ली- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे.कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार राज्यसभेच्या खासदारांना निरोप देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी गुलाम नबी आझाद यांच्या आठवणींना उजाळा दिला. एका दहशतवादी घटनेचा संदर्भ देताना मोदी भावूक झाल्याचे देखील पाहायला मिळाले.
गुलाम नबी आझाद राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते आहेत आणि त्यांचा कार्यकाल १५ तारखेला संपणार आहे. त्यामुळे गुलाम नबी आझाद राज्यसभेतून गेल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार ? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. गुलाम नबी आझाद यांच्याजागी मल्ल्किार्जुन खर्गे यांची वर्णी लागू शकते अशी माहिती समोर येत आहे.
मलिकार्जुन खर्गे हे कर्नाटकातून राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत. याआधी त्यांनी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी याआधी काँग्रेसचे गटनेते म्हणून सभागृहात काम पाहिले आहे.
गुलाम नबी आझाद निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी खर्गेंची शिफारस करण्यात आली आहे अशी देखील माहिती समोर येत आहे. खर्गे हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते असून संसदीय कामकाजाचा गाढा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- आईला फोन केल्यामुळे फरार कैदी पोलिसांच्या जाळ्यात अडकला
- आदित्य ठाकरेंच्या नावाने सरकारी योजना; मागासवर्गीय युवकांना मिळणार प्रशिक्षण
- जालना: ओपीडी सुरू, मात्र जिल्हा रुग्णालयाकडून ना प्रसिद्धिपत्रक, ना आवाहन; रुग्णांना मनस्ताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
