Share

लातूरच्या रिंगरोडचे काम आशियाई विकास बँक अर्थसहाय्यातून- अशोक चव्हाण

Published On: 

🕒 1 min read

लातूर: जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाला गती देणार असून शहराबाहेरून जाणाऱ्या नवीन बाह्यवळण रस्त्याचे काम आशियाई बँक निधीतून करण्यात येणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे. अशोक चव्हाण आणि पालकमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

लातूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तसेच सुधारणांसाठी पुरेसा निधी मिळावा, मागील कामांची थकित देयके देण्यात यावीत तसेच लातूर शहरातून जाणाऱ्या लातूर-नांदेड महामार्गावर शहरात उड्डाणपूल उभारावा, टेंभूर्णी ते लातूर मार्गाची रुंदीकरण करण्यात यावे ,लातूर शहराभोवतीच्या रस्ते मुख्य मार्गाशी जोडणे, लातूर शहराच्या बाजूने रिंगरोड तयार करण्यासाठी निधी मिळणे, ग्रामीण लातूर व रेणापूर मतदारसंघातील रस्ते कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे, अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तरतूद करणे आदी विविध मागण्या अमित देशमुख यांनी केल्या.

यावेळी लातूरसह मराठवाड्यातील रस्त्यांच्या कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही. तसेच मागील थकित रक्कम देण्यासाठी प्रयत्न करू. लातूर-नांदेड महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असून त्यांच्याशी संपर्क साधून शहरातून जाणाऱ्या ७ किमी मार्गावर उड्डाणपूल उभारण्यासाठी प्रस्ताव राष्ट्रीय महामार्गाकडे पाठविण्यात येईल. पुण्याला जाणाऱ्या मार्गावर टेंभूर्णी ते लातूर ह्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे कामही लवकरच केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन चव्हाण यांनी दिले.

दरम्यान, लातूर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या ६१ किमीच्या नवीन रिंगरोडच्या कामास मंजुरी देण्यात आली असून ५० किमीचे भूसंपादन झाले आहे. उर्वरित ११ किमीमध्ये रस्ता अस्तित्वात आहे. या रिंगरोडचे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी आशियाई विकास बँक अर्थसहाय्यातून तो करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री अशोक चव्हाण यांनी याप्रसंगी दिले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!