Share

लातुरने औरंगाबादची रेल्वे पळवली; औरंगाबादकरांवर पुन्हा अन्याय

Published On: 

औरंगाबाद : लातुर विभागाने औरंगाबादकरांची रेल्वे चोरली असा आरोप केला जात आहे. अनेक वर्षापासुन संघर्ष करुन शहरातील हिरालाल कासलीवाल यांनी मागणी करुन कोल्हापुर धनबाद एक्सप्रेस औरंगाबाद मार्गे सुरू केली. पण आता ही रेल्वे लातुरकरांनी पळवली आहे. येत्या १९ फेब्रुवारी पासुन ही रेल्वे आपल्या नविन मार्गानुसार लातूर परभणी-परळी या मार्गाने धावेल.

एकाच वेळी विविध धर्मीयांच्या देवस्थानांना जोडणारी रेल्वे म्हणून कोल्हापुर-धनबाद एक्सप्रेस ओळखली जाते. झारखंडमधील शिखर सम्मेदजी, बौद्धगया, बनारस अशा अनेक धर्मीक स्थळाना जाण्यासाठी कोल्हापुर-धनबाद एक्सप्रेस ही शहरवासीयासांठी सोयीची होती. पण केज विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांनी रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांना निवेदन देऊन रेल्वे मार्गात बदल करुन घेतला. यामुळे रेल्वे प्रशासनाने निवेदनानुसार रेल्वे मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला. नवीन सुधारित वेळापत्रकानुसार कोल्हापूर-धनबाद रेल्वे आता लातूर- परळी-परभणीमार्गे धावणार आहे. औरंगाबादकरांच्या हक्काची एक रेल्वे लातुरने पळवली आहे यामुळे येथील भाविकांची मोठी अडचण झाली.

शहरवासीयांनी औरंगाबाद मार्गे फेस्टीवल रेल्वे चालु करावी अशी मागणी बऱ्याच काळापासून केली जात आहे. पण ही मागणी पुर्ण करणे तर दुरच शॉर्टकट देण्याच्या बहाण्याने हक्काची रेल्वेही पळवली गेली. नव्याने आता ही रेल्वे कोल्हापूरहून निघाल्यानंतर मिरज, पंढरपूर, कुर्डुवाडी, लातूर, परळी, परभणी, नांदेड, आदिलाबाद नागपूर, गया, पारसनाथमार्गे धनबादला जाईल आणि याच मार्गे परतीच्या प्रवासाला निघेल. मराठवाडा रेल्वे विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी रेल्वे मार्गाच्या बदलावर नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!