मुंबई : परखड लेखन, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे, आपल्या साहित्याने जनमानस ढवळून काढणे आणि तितक्याच जोरकसपणे सार्वजनिक जीवनात स्पष्ट मते व्यक्त करून प्रसंगी वादाला तोंड फोडणारे प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार म्हणू भालचंद्र नेमाडे परिचित आहेत. त्यांच्या लिखाणावरून नेहमीच वादविवाद सुरु असतात. नेमाडे यांनी कोसला, बिढार, जरीला, हूल, तुकाराम, हिंदू यांसारख्या दर्जेदार ग्रंथांची निर्मिती केली आहे.
‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीला २०१४ साली साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. लेखक भालचंद्र नेमाडे यांनी या कादंबरीत लभाण-बंजारा समाजातील स्त्रियांबद्दल आक्षेपार्ह लेखन केले आहे. त्यामुळे हा पुरस्कार परत घेण्याची मागणी केली जात आहे. ‘लेखक नेमाडे यांना तात्काळ अटक करावी. तसेच त्यांना चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्यावा व कादंबरीच्या विक्रीवर तत्काळ बंदी आणावी अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनीही या कांदबरीवर बंदी घालण्यात यावी तसेच लेखक आणि प्रकाशकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
हरिभाऊ राठोड यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत लेखक भालचंद्र नेमाडे यांचा धिक्कार केला आहे. हिंदू कादंबरीचे लेखक नेमाडे आणि प्रकाशक पॉप्यूलर प्रकाशन यांच्यावर अनुसुचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी राठोड यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेत प्रवेश केलेल्या राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांना नोटिसा
- आमच्याच नेत्यांकडून ओबीसी नेतृत्व संपवण्याचा कट, भाजप नेत्याने दिला राजीनामा
- ‘बरेच हिशोब मुंबईकरांचे बाकी आहेत, त्यामुळे जाच तुम्ही घराघरात’
- ‘या’ माजी कर्णधार आणि स्टार फलंदाजाची आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
- स्वतंत्र भारतात प्रथमच ज्या महिलेला फाशी दिली जाणार आहे तिने जाणून घ्या काय केलाय गुन्हा !


