Share

आगामी कसोटी सामन्यात ‘या’ स्टार खेळाडूच्या पुनरागमनाची शक्यता

Published On: 

चेन्नई: इग्लंड व भारतीय संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना भारतीय संघाने 317 धावांनी जिंकला.दुसऱ्या डावात अक्षर पटेलने इग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडत विजयात मोठा वाटा उचलला. त्याने 60 धावा देत 5 बळी घेतले तर, आर अश्विनने देखील तीन बळी घेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

चेपॉकच्या खेळपट्टीवर 482 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करणारा इंग्लंडचा संघ भारतीय फिरकीच्या जाळ्यात अडकला. चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्राअखेर इंग्लंड संघानं सर्व गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या करता आल्या. चार कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.ऑल राऊंड कामगिरी करणारा आर. अश्विन या टेस्टचा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला.

या सामन्यात अनेक विक्रम पाहायला मिळाले.कसोटी क्रिकेटमध्ये ३०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी विजय मिळवण्याची भारताची ही एकूण सहावी वेळ होती. याआधी भारताने ५ वेळा ३०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी विजय मिळवला होता. तसेच धावांच्या तुलनेतील भारताचा हा ५ वा सर्वात मोठा कसोटी विजय आहे.

दरम्यान, पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताची फिरकी गोलंदाजी उत्तम झाली. पण वेगवान गोलंदाजांना अपेक्षित यश मिळू शकलं नाही. आता तिसरा सामना २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान अहमदाबादला होणार आहे. या सामन्यासाठी भारताचा स्टार खेळाडू संघात परतणार असल्याची चर्चा आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शमी आणि नवदीप सैनी दोघेही दुखापतीमुळे संघाबाहेर होते. पण तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी या दोघांना संघात स्थान देण्याबाबत विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

भारतातील स्थानिक क्रिकेट स्पर्धा असलेल्या विजय हजारे करंडकमध्ये शमी आणि सैनी दोघेही खेळणार होते. पण भारतीय संघाच्या व्यवस्थापनाने या दोघांनाही स्थानिक स्पर्धेत। न खेळण्याचा सल्ला दिला. मंगळवारी दुसरी कसोटी संपली त्यामुळे लवकरच उर्वरित दोन कसोटीसाठी संघाची घोषणा करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!