पुणे : राज्यात सद्या पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आहे. एका मंत्र्यासोबत या प्रकरणाचे धागेदोरे आढळून आल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. पूजाला न्याय मिळावा अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे.याआधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नेते मेहबूब शेख यांचे नाव देखील वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आल्याने राज्यातील महिला सत्ताधारी नेत्यांपासून सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्रात आवाज बुलंद होत असताना महिला पुरुषासोबत वर्षभर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतात आणि नंतर सांगतात माझा बलात्कार झाला, असं धक्कादायक विधान समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी करत महिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले आहे.
‘पडद्याशिवाय राहिलात, पुरुषांमध्ये फिरलात, लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिलात, तर अशा गोष्टी होण्याची शक्यता वाढते. अशा गोष्टींची तक्रार झाल्यानंतर पुरुषाचं नाव मीडियात अजिबात येता कामा नये” अशी मागणी देखील अबू आझमी यांनी केली.
देशात कायदा चुकीचा आहे. कायद्यानुसार कोणतीही स्त्री लग्नाशिवाय कोणत्याही व्यक्तीसोबत राहू शकते. लिव्ह इन रिलेशनमध्ये. लिव्ह इन रिलेशन म्हणजे काय तर, महिला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू देता त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही आणि वर्षभरानंतर सांगतात माझा बलात्कार झाला,’ अशी टिप्पणी अबू आझमी यांनी केली आहे.
अबु आझमी यांच्या या वादग्रस्त विधानामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी अबू आझमी यांच्यावर प्रहार केला आहे. ‘नेतेमंडळी महिलांना बदनाम करण्यासाठी असे स्टेटमेंट करत आहे. कारण अनेक नेत्यांचे नाव सध्या बलात्कार प्रकरणांमध्ये आल्यामुळे त्यांना वाचविण्याचे काम त्यांचे सहकारी, पक्ष आणि आघाडी करत आहे. म्हणूनच मग महिला कशा चुकीच्या आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न काल अबू आझमींच्या माध्यमातून केला गेला म्हणजे महिलांना बदनाम करण्याचा डाव सध्या राजकारण्यांच्या माध्यमातून होतोय,’ असा घणाघात तृप्ती देसाई यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वतंत्र भारतात प्रथमच ज्या महिलेला फाशी दिली जाणार आहे तिने जाणून घ्या काय केलाय गुन्हा !
- पवारांनंतर आता उदयनराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला
- आम्हीच श्रीरामांचे वंशज, भाजपला श्रीरामचंद्रांशी काही घेणं देणं नाही – राकेश टिकैत
- शिवसेनेत प्रवेश केलेल्या राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांना नोटिसा
- नामांकित उद्योजकाला महिलेसह दोघांची खंडणीची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

