Share

‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत ऍमेझॉन’या’ शहारात इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मिती

Published On: 

नवी दिल्ली : ‘आत्मनिर्भर भारत’ या भारत सरकारच्या मोहिमे अंतर्गत भारतीय निर्मितीला चालना देण्यात येणार आहे. यामध्ये आता ऍमेझॉन इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मिती करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद आणि ऍमेझॉन इंडियाचे सीनिअर वाईस प्रेसिडंट अमित अग्रवाल यांच्यात मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.

या वर्षाच्या अखेरीस ऍमेझॉन चेन्नईमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करणार असल्याचे कंपनीने सांगितलं आहे. कंपनी या युनिटमध्ये फायर टीव्ही स्टिकसह इतर साधनांची निर्मिती करणार आहे. याशिवाय 2025 पर्यंत ऍमेझॉनने भारतातील 10 दशलक्ष लघू आणि मध्यम व्यवसायांच्या डिजिटायझेशनसाठी 1 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह 10 लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवलं आहे.

यावेळी अमेझॉन जागतिक कंपनी असली तरी अमेझॉन इंडियाने भारतीय व्यवसाय क्षेत्राशी व संस्कृतीशी नाते जोडणारी भारतीय कंपनी म्हणून भरारी घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘डिजीटली सामर्थ्यवान आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या उद्दिष्टाचा हा पुढील टप्पा असेल. भारतात भारतासाठी इलेक्ट्रॉनिक उत्पादने उत्पादित करणे व ती भारताबाहेरही निर्यात करणे या अमेझॉनच्या प्रयत्नांचा हा आरंभ असेल’ असं रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलं.

CAIT ने केला होता ई-कॉमर्स कंपन्यांवर आरोप
ई-कॉमर्स कंपन्यांकडून ऑनलाईन खरेदी तसेच त्यांच्या कडून दिल्या जाणाऱ्या नवीन ऑफर्स मूळे स्थानिक विक्रेत्यांचा व्यवसाय वर देखील मोठा परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर व्यापारी संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात CAIT ने ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो, स्विगीसह अनेक ई-कॉमर्स कंपन्यावर मोठा आरोप लावाण्यात आला होता.

या कंपन्या कायदेशीर मेट्रोलॉजी कायदा 2011 आणि FSSAI ने जारी केलेल्या सूचनांचं उल्लंघन करत असल्याचा आरोप कॅटने केला होता. या कायद्यानुसार ई-कॉमर्स पोर्टलला आता अनिवार्यपणे विक्रेता आणि वस्तूसंबंधी प्रत्येक माहिती स्पष्टपणे, प्रत्येक उत्पादनावर लिहिणं अनिवार्य आहे. परंतु या कंपन्या या नियमाचं उल्लंघन करत असल्याचं म्हणत, केंद्र सरकारने याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!