लातूर: जिह्यात कोरोनाचा प्रसुरभाव वाढत आहे, त्यात लातूर शहरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, महापालिका प्रशासनाने रुग्णांची तपासणी, लसीकरण, उपचार व प्रतिबंध या चार स्तरांवर पूर्ण क्षमतेने काम सुरू केलेले आहे. तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे निर्बंध आणखी कडक करुन विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त अमन मित्तल यांनी दिले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त अमन मित्तल व महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी ऑनलाईन संवादातून देऊन पत्रकारांच्या सूचना जाणून घेतल्या. सुरुवातीला मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी, शहरात उद्भवलेल्या कोरोनाबाबत व त्यावर केलेल्या उपाययोजनांची माहिती सांगितली. गेल्या आठ दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. आतापर्यंत शहरात १७ हजार २२५ जणांना बाधा झाली असून, पैकी ३१८० ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती दिली.
आयुक्त अमन मित्तल यांनी सांगितले की, सध्या ४ कोविड केअर सेंटरमध्ये ५०० खाटांची उपलब्धता आहे. आज २०० खाट कार्यान्वित केले आहेत. ऑक्सिजन खाटाची संख्या वाढविली जात आहे. १६ केंद्रांवर लसीकरण तर ५ केंद्रांसह ४ मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून चाचण्या केल्या जात आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज ५ टक्के रुग्णांनाच असते. आता डॉक्टरांनी रुग्णाच्या पूर्ण माहितीसह प्रि्क्रिरप्शन दिल्याशिवाय इंजेक्शन देऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- लॉकडाउनबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आजच घेणार, मुंबईच्या पालकमंत्र्यांनी दिले संकेत
- आजच्या सामन्यात मुंबईचे पारडे जड; ‘हे’ आहे कारण
- सोनाली कुलकर्णीने दिल्या गुढीपाडव्याच्या खास शुभेच्छा !
- मोदी हे ७० वर्षात देशाला लाभलेले अत्यंत बेजबाबदार व बेफिकीर पंतप्रधान – नाना पटोले
- 72 टक्के जपानी जनतेचा टोकियो ऑलिम्पिकला विरोध – क्युडो न्यूज सर्व्हे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

