🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- दिवंगत नेते बाळासाहेब विखेंनी सत्ता आणि राजकारणातून समाज बदलण्यावर भर दिला. गाव आणि गरीबांच्या समस्यांवर त्यांनी आयुष्यभर लढा दिला. स्व.बाळासाहेब विखे पाटलांनी सत्तेसाठी तत्वांशी कधीच तडजोड केली नाही.
तसेच परिणामांचा विचार न करता, तत्त्वाशी एकनिष्ठ राहिले, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटलांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
आ.विखे पुढे म्हणाले की, माझे वडील बाळासाहेब विखे यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित घटकाच्या कल्याणासाठी समर्पित केले. शेतकरी, कष्टकरी वर्गासाठी त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला. स्व.बाळासाहेब विखे पाटलांनी सत्तेसाठी तत्वांशी कधीच तडजोड केली नाही. आपल्या तत्वांवर ते कायम ठाम राहिले.
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचे बाळासाहेब विखेंचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांचे हेच स्वप्न पुढे घेऊन जाण्याचे काम युती सकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून फडणवीसांनी राज्याला दुष्काळमुक्त करण्याचे काम केले.
सहकाराचे रोपटे बाळासाहेबांनीच लावले असून, त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केल्याचे आ.विखे यांनी सांगितले. तसेच बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणे, ही आनंदाची गोष्ट आहे. देशाच्या खंबीर नेतृत्वाच्या हस्ते प्रकाशन, हा बाळासाहेब विखे यांचा गौरवच आहे, असे आ.विखे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
- ‘काँग्रेसची मंडळी केवळ राजकारणासाठी नव्या कृषी कायद्यांना विरोध करत आहेत’
- मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे आंदोलन, प्रविण दरेकर-प्रसाद लाड पोलिसांच्या ताब्यात
- ‘उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुखांचे सुपुत्र; आम्हाला हिंदुत्वाचे धडे घेण्याची गरज नाही’
- उपराष्ट्रपतींची कोविड-19 चाचणी निगेटीव्ह, लवकरच दैनंदिन कार्याला सुरुवात करणार
- महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही; पाटील यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
